Nilam Gorhe: “कोणाचे दिवस आलेत आणि कोणाचे दिवस भरलेत लवकरच कळेल”, नीलम गोऱ्हेंची उद्धव ठाकरेंवर टीका

139
Nilam Gorhe:
Nilam Gorhe: "कोणाचे दिवस आलेत आणि कोणाचे दिवस भरलेत लवकरच कळेल", नीलम गोऱ्हेंची उद्धव ठाकरेंवर टीका

कोणाचे दिवस आलेत आणि कोणाचे दिवस भरलेत, हे लवकरच कळेल. हे चार जूनला सिद्ध होणार आहे. राजकीय दृष्ट्या जनाधार संपला, एवढं मात्र उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येईल. असं म्हणत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

(हेही वाचा –Heatstroke: उष्मघाताचे चटके कायम! राज्यात रुग्णसंख्या ७७ वर)

नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं की, “प्रत्येक पक्ष हे काम करतच असतात. राहुल गांधींनी त्यांनी केलेलं वचन, जाहीरनामे आणि निवेदन आणि मनमोहन सिंहाच्या काळातील निर्णयाचे कागद फाडून टाकले होते. तसे स्वतःच्या खासदारांचे निर्णय ते फाडून टाकणार नाही याचे उत्तर पहिले त्यांनी द्यावे. रश्मी बर्वे प्रकरणांमध्ये जे काही निर्णय घेतलेले आहे, त्याबद्दलची सहानुभूती मिळून उलट महिला मतदारांची लोकप्रतिनिधींची ही जबाबदारी आहे.” असं त्या (Nilam Gorhe) म्हणल्या.

(हेही वाचा –Unseasonal Rain: अवकाळी पावसाने कुठे किती नुकसान? वाचा सविस्तर)

भावनाताईंचं कार्य दुर्लक्षित राहणार नाही

भावना गवळी (Bhavna Gawali) यांच्याबद्दल बोलताना त्या (Nilam Gorhe) म्हणाल्या, “उमेदवारी गेल्यावर भावना गवळी यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे. भावनाताईंचं कार्य दुर्लक्षित राहणार नाही आणि त्यांना सामावून घेऊ, असं मुख्यमंत्री यांनी सांगितलेल आहे. मुख्यमंत्री ते स्वतःचा शब्द लगेचच पाळतात. यावर लवकरच चांगल्या प्रकारे मार्ग निघू शकेल. भावनाताईंना सोबत घेऊनच पुढे जाणार आहोत. रवींद्र वायकर यांच्यासंदर्भात काही भाकीत करणे म्हणजे रस्त्यावर बसलेल्या ज्योतिषी प्रमाणे काही तरी सांगण्यासारखे आहे. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. शिंदे साहेब त्यावर निर्णय घेतील.” अशी माहिती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी दिली. (Nilam Gorhe)

हे पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.