राऊत-ठाकरेंवर BJP ची घणाघाती टीका; पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल

79
राऊत-ठाकरेंवर BJP ची घणाघाती टीका; पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल
राऊत-ठाकरेंवर BJP ची घणाघाती टीका; पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल
  • विशेष प्रतिनिधी

भाजपाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शनिवारी जोरदार टीका केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवरून विरोधकांवर निशाणा साधला.

नवनाथ बन यांनी अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांच्याबाबत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलेल्या कथित वक्तव्यांचा संदर्भ देत त्यांच्यावर उपरोधिक टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर सातत्याने होत असलेल्या टीकेवरही त्यांनी आक्षेप घेतला.

यावेळी त्यांनी संसदेत मंजूर झालेल्या विविध विधेयकांचा उल्लेख करत केंद्र सरकारने (Central Govt) देशहिताचे निर्णय घेतल्याचा दावा केला. कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयापासून ते इतर राष्ट्रीय मुद्द्यांपर्यंत अमित शाह यांच्या भूमिकेचे समर्थन करत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

(हेही वाचा – “टिळकांच्या नजरेतून भगवद्गीता वाचा, तुम्ही आयुष्यात…”; केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांचा तरुणांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?)

संजय राऊत यांच्यावर टीका करताना बन यांनी उद्धव ठाकरे गटाच्या राजकीय स्थितीवरही भाष्य केले. महाराष्ट्रातील जनतेने निवडणुकांमधून आपला कौल स्पष्ट दिला असून आगामी काळातही भाजपाला (BJP) जनतेचा पाठिंबा कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर होत असलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. जनतेने त्यांना वारंवार निवडून दिले असल्याचे सांगत विरोधकांनी तथ्यहीन आरोप करणे थांबवावे, असे त्यांनी म्हटले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना नवनाथ बन म्हणाले की, देशातील तरुणांवर विश्वास ठेवून त्यांना विकासाच्या प्रवाहात सहभागी करण्याची भूमिका केंद्र सरकारची आहे. तरुणांच्या पाठिंब्यामुळेच नरेंद्र मोदी यांनी सलग तीन वेळा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली असून भविष्यातही जनतेचा विश्वास भाजपावर कायम राहील, असा दावा त्यांनी केला.

पत्रकार परिषदेदरम्यान नवनाथ बन यांनी विरोधकांच्या अनेक वक्तव्यांवर प्रतिउत्तर देत भाजपाची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.