Narendra Modi Ramtek : …तेव्हा लोकशाही धोक्यात नव्हती का ?; पंतप्रधानांचा रामटेकमधून काँग्रेसवर हल्लाबोल

Narendra Modi Ramtek : आणीबाणीच्या वेळी लोकशाही (Democracy) धोक्यात आली नव्हती. चारही दिशेला बंधनेच होती. तेव्हा लोकशाही धोक्यात नव्हती ? एका गरिबाचा मुलगा पंतप्रधान बनताच त्यांना लोकशाही आणि संविधान धोक्यात दिसत आहे.

116
Narendra Modi Ramtek : ...तेव्हा लोकशाही धोक्यात नव्हती का ?; पंतप्रधानांचा रामटेकमधून काँग्रेसवर हल्लाबोल
Narendra Modi Ramtek : ...तेव्हा लोकशाही धोक्यात नव्हती का ?; पंतप्रधानांचा रामटेकमधून काँग्रेसवर हल्लाबोल

इंडि आघाडीचे नेते आरोप करतात की, मोदी पुन्हा सत्तेत आले की, लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल. हा आरोप तसा नवीन नाही. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार बनले, तेव्हाही विरोधक हेच बोलत होते. मी जेव्हापासून राजकारणात आलो आहे, तेव्हापासून एक निवडणूक गेली नाही, जेव्हा ही कथा पसरवली गेली नाही. यांची दिवाळखोरी इतकी आहे की, नवी कल्पनाही नाही. आणीबाणीच्या वेळी लोकशाही (Democracy) धोक्यात आली नव्हती. चारही दिशेला बंधनेच होती. तेव्हा लोकशाही धोक्यात नव्हती ? एका गरिबाचा मुलगा पंतप्रधान बनताच त्यांना लोकशाही आणि संविधान धोक्यात दिसत आहे. इंडि आघाडीवाले (India Alliance) कधीही गरिबांना पुढे जाताना बघू शकत नाहीत, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Ramtek) यांनी काँग्रेसवर केले. ते रामटेक येथे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

(हेही वाचा – Devendra Fadnavis : संविधान बदलणे अशक्य, काँग्रेसकडून अपप्रचार केला जातो; देवेंद्र फडणवीसांचा आरोप)

योजनांची गॅरंटी, हाच सेक्युलरिझम

या वेळी विरोधकांवर निशाणा साधतांना पंतप्रधान मोदी यांनी मराठी म्हण वापरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, “काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. पाण्यात कितीही लाठी मारा. पाणीत भेद होणार नाही. गरिबाच्या मुलावर या लोकांनी कितीही हल्ला केला, तरी मोदी देशाच्या संकल्पनांसाठी मागे हटणार नाही. गरिबांना सुविधा देण्याचे काम मोदींनी केले आहे. गरिबांना पक्के घर, मोफत रेशन, उपचार, वीज, पाणी यांची गॅरंटी ही मोदी गॅरंटी (Modi Guarantee) आहे. त्याचे सर्वाधिक लाभार्थी SC, ST आहेत. मोदी योजनांची गॅरंटी, हाच सेक्युलरिझम आहे. सर्वांसाठी योजना लागू केल्याने येथे भेदभावांची शक्यताच नाही. शत-प्रतिशत लोकांना योजनांचा लाभ मिळतो.”

मी १० वर्षांत केलेली कामे हे जेवणापूर्वीची अॅपेटायझर आहेत. खरी थाली तर अजून बाकी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र या वेळी म्हणाले. (Narendra Modi Ramtek)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.