Devendra Fadnavis : संविधान बदलणे अशक्य, काँग्रेसकडून अपप्रचार केला जातो; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

रामटेक येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

133

काँग्रेसच्या पोपटांकडून संविधान बदलले जाणार असल्याचा अपप्रचार केला जात आहे. जोपर्यंत चंद्र-सूर्य तारे आहेत तोपर्यंत कोणीही संविधान बदलू शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संविधान अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

(हेही वाचा Nitin Gadkari : संविधान तोडण्याचे काम काँग्रेसने केले; नितीन गडकरी यांचा हल्लाबोल)

कॉंग्रेसला मतांसाठीच समाज लागतो 

रामटेक येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. माझा काँग्रेसवाल्यांना प्रश्न आहे की, तुम्हाला मतांसाठी समाज चालतो. पण त्या समाजासाठी कोणताही विकास करण्याची तुमची तयारी तरी आहे का?, देशाच्या विकासासाठी अधिक मजबूत करण्यासाठी नागपूर, भंडारा-गोंदिया व रामटेकमधील मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावे, असे आवाहन देखील फडणवीस यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशासह विदर्भाचा विकास होत आहे. समृद्धी महामार्ग आता भंडारा, गोंदियापर्यंत नेणार आहोत. त्यामुळे या भागाचा अधिक विकास होईल. 5 वर्षांत मोदींनी 50 कोटी लोकांच्या घरात पाणी पोहोचवले आहे, रामटेकमधील राम मंदिरासाठी आम्ही निधी दिला, असे फडणवीस (Devendra Fadnavis)  म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.