Ashish Shelar : उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मूर्खांच्या नंदनवनात

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न या आरोपावरुन आशिष शेलारांचा पलटवार

113
Ashish Shelar : उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मूर्खांच्या नंदनवनात
Ashish Shelar : उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मूर्खांच्या नंदनवनात

नीती आयोग सहकार्य आणि मार्गदर्शन करणार, संपूर्ण योजना कार्यान्वित राज्य सरकार करणार, ग्रोथ सेंटर एमएमआर असणार. केंद्र सरकार त्यात निधी देणार, मुंबईचा असा विचार पहिल्यांदाच केंद्र सरकार करते आहे. आम्ही केंद्र सरकारचे अभिनंदन करतो आणि थेट विरोधकांना सांगतो याच मुद्द्यांवर तुम्ही निवडणुकीत आमच्या समोर या. नीती आयोगाबाबत प्रश्न विचारणार असतील तर आमचं त्यांना स्पष्ट उत्तर आहे. मूर्खांच्या नंदनवनात उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे, अशा शब्दात मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला बोल केला.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना आमदार ॲड आशिष शेलार म्हणाले की, जयंत पाटील यांचा मुंबईशी संबंध काय? मुंबईकरांशी घेण देण काय? जयंत पाटील यांचा अभ्यास कच्चा आहे आणि त्यांचे भाषण असत्य आहे. ज्या १०६ हुतात्म्यांवर गोळीबार केले त्या काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारने केले. त्या १०६ हुतात्म्यांच्या रक्ताचे हात काँग्रेसचे आहेत आता उद्धवजींच्या पक्षाला ते लागले आहेत, राष्ट्रवादी तेव्हा नव्हतीच. १०६ हुतात्म्यांचे रक्त सांडण्याचे काम आणि पाप हे काँग्रेस आणि उद्धवजींच्या शिवसेनेचे आहे.

नीती आयोगाबाबत प्रश्न विचारणार असतील तर आमचं त्यांना स्पष्ट उत्तर आहे. मूर्खांच्या नंदनवनात उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आज मला या ठिकाणी हेही स्पष्ट करायचे आहे अन्यथा मी बोललो नसतो तो माझा स्वभाव नाही. मोठ्या दैनिकाचे विद्वान संपादक कालपर्यंत ते बुद्धिवान आहेत असा आमचा समज होता पण तेही छिद्रानवेशी आहेत, त्यांचाही संजय राऊत झाला आहे. नीती आयोग हे कुठल्याही गोष्टींची कार्यान्वय करणारी यंत्रणा नव्हे. नीती आयोग ही थिंक टँक आहे. नीती आयोग काहीतरी करणार आहे घडवणार आहे हा आरोपच मुळात मूर्खपणाचा आहे. २०४७ पर्यंत भारत देश अमृत काळ पूर्ण करेल तोपर्यंत कसा विकास झाला पाहिजे हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व देशात सांगत आहेत, ते लाल किल्ल्यावरील भाषणातही बोलले होते.

२०४७ पर्यंत भारताच्या विकासातील उद्दिष्ट ही शहराच्या विकासाशिवाय होऊ शकत नाही. कारण शहर ग्रोथ हब आहेत. शहराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून आहे. म्हणून निती आयोग थिंक टँक म्हणून सहकार्य आणि मार्गदर्शन करणार आहे. ते महाराष्ट्र सरकारला करणार आहेत. त्यामुळे निती आयोगातून दिल्लीवरून कोणीतरी येऊन इतर काहीतरी बदल करणार आहे ही छिद्रानवेशी भूमिका आहे. यासाठी वीस शहरे निवडली जाणार आहेत. त्या वीस शहरांमध्ये पहिल्या चारमध्ये मुंबई आहे. यात मुंबई पहिल्यांदा घेतली याबद्दल आम्ही समस्त मुंबईकरांच्या वतीने माननीय मोदीजींचे आणि राज्य सरकारचे धन्यवाद व्यक्त करत, अभिनंदन करतो. जर नीती आयोगाने चार अन्य शहरे निवडली असती तर कोल्हेकुई करणारे तर मुंबईला का नाही निवडलं मुंबईच्या बाबतीत तकलादू भूमिका, विरोधी भूमिका म्हणून कोल्हेकुई केली असती.
त्यांना आज बोलायला जागा नाही म्हणून खोटे बोलत आहेत.

(हेही वाचा – Indian Space Economy : भारतीय अंतराळ अर्थव्यवस्थेची क्षमता १०० अब्ज डॉलर्स होईल – डॉ. जितेंद्र सिंह)

पहिल्या चार शहरात मुंबई आहे. त्यातही ज्यांचा संजय राऊत झालाय त्या संपादकांनी त्याचा अभ्यास करावा. हा पूर्ण ग्रुप म्हणून एमएमआरचा विषय आहे. आणि एमएमआर म्हणजे केवळ मुंबई महानगरपालिका नाही तर त्यात नऊ अन्य महानगरपालिका आहेत. नऊ महानगरपालिका देशापासून वेगळी करणार असं मुर्खांसारख्या विधान करणाऱ्यांना बे अक्कल म्हणावे नाहीतर काय म्हणावे? यांच्या आरोपांना घेऊन वादविवाद करायचा असेल तर उल्हासनगर देशापासून वेगळे होणार आहे का? ठाणे वेगळे होणार आहे का? मीरा-भाईंदर देशापासून वेगळा होणार आहे का? हा तोडण्याचा डाव आहे. ही मूर्खांच्या नंदनवनात जगणारी लोक आहेत त्यामुळे नीती आयोग सहकार्य आणि मार्गदर्शन करणार संपूर्ण योजना कार्यान्वित राज्य सरकार करणार ग्रोथ सेंटरचा एमएमआर असणार. केंद्र सरकार त्यात निधी देणार मुंबईचा असा विचार पहिल्यांदाच केंद्र सरकार करते आहे, आम्ही केंद्र सरकारचे अभिनंदन करतो आणि थेट विरोधकांना सांगतो याच मुद्द्यांवर तुम्ही निवडणुकीत आमच्या समोर या. मुंबईच्या विकासासाठी दिल्ली मुंबईकडे येते. मुंबईकरांचा विकास, सुबत्ता, आर्थिक ग्रोथ यातून नोकऱ्या वाढणार आहेत. त्यासाठी दिल्ली कडून मुंबईकरांना सहकार्य करायला येते आहे त्याचे आम्ही स्वागत करतो. अशा शब्दात आमदार ॲड आशिष शेलार यांनी ठणकावले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.