उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा अपमान केला; राहुल शेवाळे यांचा घणाघात

142

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या मणिशंकर अय्यरांविरोधात बाळासाहेबांनी जोडे मारो आंदोलन केले होते. आता राहुल गांधी तशी वक्तव्ये सातत्यपूर्ण करीत असताना उद्धव ठाकरे यांनी त्याचा साधा निषेधही नोंदविलेला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मानणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हा अपमान आहे, असा घणाघात खासदार राहुल शेवाळे यांनी केला.

(हेही वाचा – राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांची पोलिसांत तक्रार, केली अटकेची मागणी)

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींविरोधात गुरुवारी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांच्यासमवेत खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर आणि सावरकरप्रेमी उपस्थित होते. तक्रार दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना शेवाळे म्हणाले, राहुल गांधींनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही, अशी सारवासारव करून उद्धव ठाकरेंनी माध्यमांच्या प्रश्नांना बगल दिली. त्यामुळे त्यांच्या हिंदुत्त्वाचा खरा चेहरा उघड झाला आहे.

मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर बाळासाहेबांनी आम्हा सर्व शिवसैनिकांना जोडे मारो आंदोलन करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर शिवाजी पार्कजवळ मणिशंकर अय्यर यांना जोडे मारण्यात आले. राहुल गांधींनी सावरकरांविषयी वक्तव्य केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही शिवसैनिकांना तसे आदेश देणे अपेक्षित होते. पण त्यांनी साधा निषेधही नोंदवला नाही. बाळासाहेबांच्या स्मृतीदिना दिवशी तरी त्यांनी असे खोटे वर्तन करायला नको होते. त्यांच्यामुळे बाळासाहेबांचा अपमान झालेला आहे, अशी टीकाही शेवाळे यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.