Monsoon Session 2023 : मुख्यमंत्र्यांकडील अतिरिक्त खात्याची जबाबदारी अन्य मंत्र्यांवर

या खात्यांच्या अनुषंगाने सभागृहात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे हे मंत्री देतील.

112
Monsoon Session 2023 : मुख्यमंत्र्यांकडील अतिरिक्त खात्याची जबाबदारी अन्य मंत्र्यांवर

पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session 2023) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडील खात्यांची जबाबदारी सहकारी मंत्र्यांवर देण्याचा निर्णय घेतला आहे. या खात्यांच्या अनुषंगाने सभागृहात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे हे मंत्री देतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेल्या खात्यांची जबाबदारी आहे. अधिवेशनकाळात (Monsoon Session 2023) या खात्यांच्या अनुषंगाने विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांवर दिली आहे.

(हेही वाचा – Narendra Modi : ‘हे तर भ्रष्टाचाऱ्यांचे संमेलन’; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या बैठकीवर केली टीका)

त्यानुसार, गुलाबराव पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग, उदय सामंत नगरविकास आणि माहिती तंत्रज्ञान, दादा भुसे परिवहन, शंभूराज देसाई सामाजिक न्याय आणि दिव्यांग कल्याण विभाग, संदीपान भुमरे माहिती आणि जनसंपर्क विभाग, दीपक केसरकर पर्यावरण आणि वातावरणीय बदल, तर अब्दुल सत्तार यांच्याकडे खनिकर्म विभागाची जबाबदारी दिली आहे. स्वतःकडील खात्यांची जबाबदारी सांभाळून उपरोक्त मंत्री अतिरिक्त खात्यांचा भार सांभाळतील.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.