Rahul Kul : भीमा-पाटस प्रकरणात राहुल कुल यांना क्लीन चिट; संजय राऊतांनी केले होते आरोप

103
Rahul Kul : भीमा-पाटस प्रकरणात राहुल कुल यांना क्लीन चिट; संजय राऊतांनी केले होते आरोप
Rahul Kul : भीमा-पाटस प्रकरणात राहुल कुल यांना क्लीन चिट; संजय राऊतांनी केले होते आरोप

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी २५ एप्रिलला मुंबईतील सीबीआय मुख्य कार्यालयाला पत्र पाठवून भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर ५०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिगचा आरोप केला होता. या प्रकरणाचा लेखी अहवाल आता चौकशी समितीकडून देण्यात आला आहे. चौकशी समितीच्या लेखी अहवालानंतर आता आमदार राहुल कुल यांना भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या कथित घोटाळ्यात राज्य शासनाकडून क्लीन चिट देण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जिल्हा पुणे तालुका दौंडा येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यांतील भ्रष्टाचाराबाबत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. तसेच राहुल कुल यांनी भीमा पाटस साखर कारखान्यात शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. मात्र साखर कारखान्यात कोणताही घोटाळा झाला नाही.

(हेही वाचा – PM Narendra Modi : लवकरच देशात नवीन शिक्षण पद्धती लागू होणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा)

२०२२-२३ चा लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झाला नाहीये. मात्र, २०२१-२२ लेखा परीक्षण अहवालात कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे राज्य सरकारने आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. तसेच इतर आर्थिक वर्षांच्या अहवालांची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून अहवालात जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई करण्याचे राज्य सरकारने आश्वासन दिले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.