PM Narendra Modi : लवकरच देशात नवीन शिक्षण पद्धती लागू होणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

118
PM Narendra Modi : लवकरच देशात नवीन शिक्षण पद्धती लागू होणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

आता लवकरच संपूर्ण देशात नवीन शिक्षण पद्धत सुरु होणार आहे. स्वतः (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल सांगतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यांनी आज म्हणजेच शनिवार, २९ जुलै रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP-National Education Policy) तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त अखिल भारतीय शैक्षणिक परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काही महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. नवी दिल्लीमधील प्रगती मैदानाच्या भारत मंडप येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
शिक्षणात नशीब बदलण्याची ताकद

पंतप्रधान म्हणाले (PM Narendra Modi) की, ”शिक्षणातच देशाचे नशीब बदलण्याची ताकद आहे. देश ज्या ध्येयाने पुढे जात आहे, त्यात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची आहे. तुम्ही (विद्यार्थी) त्याचे प्रतिनिधी आहात. अखिल भारतीय शिक्षा समागम याचा भाग बनणे ही माझ्यासाठी एक महत्त्वाची संधी आहे.”

(हेही वाचा – Buldhana Bus Accident : मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त; मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर)

10+2 ऐवजी नवीन शिक्षण पद्धत

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पारंपारिक ज्ञानापासून ते भविष्यातील तंत्रज्ञानापर्यंत महत्त्व देण्यात आले आहे. ‘देशातील शिक्षणतज्ज्ञांनी संशोधन परिसंस्था मजबूत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आमच्या विद्यार्थ्यांना नवीन व्यवस्थेची चांगली माहिती आहे. 10+2 शिक्षण पद्धतीच्या जागी आता 5+3+3+4 शिक्षण पद्धत सुरू केली जात आहे. शिक्षणाची सुरुवात वयाच्या तिसऱ्या वर्षापासून होईल. यामुळे देशात एकरुपता येईल.’ असे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी यावेळी सांगितले.

सर्व CBSE शाळांसाठी एकच अभ्यासक्रम

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) पुढे म्हणाले की, येत्या काळात देशातील सर्व सीबीएसई शाळांमध्ये एकच अभ्यासक्रम लागू केला जाईल. यासाठी 22 भाषांमध्ये पाठ्यपुस्तके तयार केली जात आहेत.

विद्यार्थ्यांना प्रतिभेऐवजी त्यांच्या भाषेच्या आधारे न्याय देणे चुकीचे

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतील शिक्षणावरही पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) भर दिला. तरुणांना त्यांच्या प्रतिभेऐवजी त्यांच्या भाषेच्या आधारे न्याय देणे हा त्यांच्यावर सर्वात मोठा अन्याय असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. मातृभाषेतील शिक्षणामुळे आता खरा न्याय भारतातील युवा कलागुणांना मिळणार आहे. सामाजिक न्यायासाठीही हे महत्त्वाचे पाऊल आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.