Buldhana Bus Accident : मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त; मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

176
Buldhana Bus Accident : मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त; मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

मलकापूर (जि. बुलढाणा) (Buldhana Bus Accident) शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील रेल्वे उड्डाणपुलावर आज दोन खाजगी बसच्या अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची माहिती घेतली असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश दिले आहेत.

या अपघातात (Buldhana Bus Accident) सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

(हेही वाचा – Bus Accident : दोन ट्रॅव्हल्स बसच्या धडकेत सहा ठार, अनेक जखमी)

मलकापूर (Buldhana Bus Accident) शहरातील महामार्ग क्रमांक सहा वरती दोन ट्रॅव्हल्सच्या बसची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना (Buldhana Bus Accident) आज, (शनिवार २९ जुलै) पहाटे तीन वाजेच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डाणपुलावर घडली. एमएच 08. 9458 ही बस अमरनाथची तीर्थयात्रा करून हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये ३५ ते ४० प्रवासी होते. तर एमएच 27 बीएक्स 4466 या ट्रॅव्हल्समध्ये २५ ते ३० प्रवासी होते. ही ट्रॅव्हल्स नागपूरहून नाशिकच्या दिशेने जात असताना मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावरती समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने अक्षरश: चुराडा झाला. या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, दसरखेड एमआयडीसीचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.