बाळासाहेबांचे विचार सोडलेले उबाठा काँग्रेसमध्ये आधीच विलीन झाला; CM Eknath Shinde यांची घणाघाती टीका

बाळासाहेबांसह करोडो रामभक्तांचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले पण काँग्रेस नाराज होईल म्हणून त्यांच्या सुपूत्राला आनंद व्यक्त करत आला नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

77
बाळासाहेबांचे विचार सोडलेले उबाठा काँग्रेसमध्ये आधीच विलीन झाला; CM Eknath Shinde यांची घणाघाती टीका

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रादेशिक पक्ष लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे विधान केले होते. त्याचा खरपूस समाचार घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. बाळासाहेबांचे विचार सोडून उबाठा काँग्रेसमध्ये केव्हाच विलीन झाले आहेत. सत्तेसाठी त्यांनी सर्व सोडले. पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून उबाठा बसले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. (CM Eknath Shinde)

संगमनेरमध्ये महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बोलत होते. ते पुढे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांचा ज्याने वध केल्या त्या औरंगजेबाचे नाव कायम ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचे लोक कोर्टात गेले होते. मात्र त्यांच्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या आणि छत्रपती संभाजी नगर आणि धाराशीव ही दोन्ही नावे कायम ठेवली. (CM Eknath Shinde)

आपले सरकार सत्तेत आल्यानंतर निळवंडे धरणाचे ५० वर्षानंतर उद्घाटन केले. ५०० वर्षांपासूनची राममंदिराची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पूर्ण केले. बाळासाहेबांसह करोडो रामभक्तांचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले पण काँग्रेस नाराज होईल म्हणून त्यांच्या सुपूत्राला आनंद व्यक्त करत आला नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले आरोग्य योजनेत ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा सर्वच जाती धर्माच्या लोकांसाठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांना रोटी, कपडा, मकान देण्याचे काम केले. विकास हाच महायुतीचा एकमेव अजेंडा आहे. ‘धनुष्यबाण रामाचा लोखंडे आपल्या कामाचा’ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – एरिअल फोटोग्राफी करुन राज्य चालवता येत नाही; CM Eknath Shinde यांची उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका)

काँग्रेस देशाचा दुश्मन असून ते पाकिस्तानची भाषा बोलत आहे – मुख्यमंत्री

पराभव दिसत असल्याने आता संविधान बदलणार अशी नवी टुम विरोधकांनी काढली आहे. मात्र डॉ. बाबासाहेबांच्या संविधानावर हा देश चालतो. त्यामुळे जोवर सूर्य आणि चंद्र आहेत तोवर संविधान कायम राहणार, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार अपमान केला. निवडणुकीत त्यांचा पराभव काँग्रेसनेच केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील सरकारने २०१५ पासून संविधान दिन सुरु केला. इतकेच काय तर लंडनमधील बाबासाहेबांचे राहत्या घराचे स्मारक केले. मुंबईतील इंदु मिलमध्ये जगाला हेवा वाटावा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक साकारले जात आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांचा सन्मान वाढवण्याचे काम सरकार करत आहे. (CM Eknath Shinde)

दलित बांधवांसाठी, आदिवासी समाजासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनेक योजना सुरु आहेत. देशाचे सर्वोच्च पद आदिवासी महिलेला देऊन मोदी सरकारने आदिवासी समाजाचा सन्मान केला आहे. विरोधकांकडे झेंडा नाही, अजेंडा नाही, निती नाही, नियत नाही त्यांना केवळ मोदी द्वेषाने पछाडले आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. काँग्रेस देशाचा दुश्मन असून ते पाकिस्तानची भाषा बोलत आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ करावा, हीच खरी देशभक्ती ठरेल, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी मतदारांना केले. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.