आटपाडीत ख्रिस्त्री धर्मांतराचे कारस्थान; आमदार पडळकरांनी मांडली लक्षवेधी

94
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत सभागृहाचे लक्ष वेधून घेणारी लक्षवेधी सूचना मांडली. आटपाडी येथे ख्रिस्ती धर्मांतराचे कारस्थान रचण्यात आले असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.
रुग्णालयात धर्मांतराचा प्रयत्न 
पडळकर यांच्या लक्षवेधीमध्ये म्हटले की, आटपाडी येथे संजय गेळे आणि त्याची पत्नी अश्विनी हे दोघे लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना आमिष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आटपाडी येथे बेकायदा चर्च बांधले आहे. वरद हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागातील अश्विनी जिरे नावाच्या मुलीच्या डोक्यावर हात ठेऊन संजय आणि अश्विनी गेळे या दोघांनी प्रार्थना म्हटल्याची घटना घडली. या प्रकरणी जादूटोणा आणि भोंदूगिरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

या प्रकारामुळे स्थानिक हिंदू धर्मीयांमध्ये नाराज आहे. शुक्रवारी, ३० डिसेंबर रोजी हिंदू धर्मीयांकडून एस.टी. स्टॅन्ड ते तहसिल कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला. ख्रिस्ती धर्मांतर करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि बेकायदा चर्चचे बांधकाम काढून टाकावे, अशा मागणी हिंदूंनी केली आहे. गेळे कुटुंबियांच्याकडे आलिशान हॉटेल, जेसीबी आणि पोकलेन मशीन आणि अनेक ठिकाणी जमिनी अशी संपत्ती आहे. ती कशी आली याची चौकशी करावी आणि कारवाई करावी, अशी मागणीही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. याबाबत लोकभावना अत्यंत तीव्र आहेत. कारवाई न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा देत शासनाने लक्ष द्यावे असा प्रश्न पडळकर यांनी विधानसभेत मांडला. या लक्षवेधी वर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेळे कुटुंबाच्या मार्फत होणारे धर्मांतर आणि चर्चच्या बांधकामाबाबत शासनामार्फत चौकशी करून कारवाई करण्याची ग्वाही दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.