पीएफआयकडून दहशतवादाचे प्रशिक्षण; एनआयएच्या छापेमारीत मोठा कट उघडकीस

119

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी केरळमधील प्रतिबंधित संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विरोधात मोठी कारवाई केली. एनआयएच्या अनेक पथकांनी केरळ राज्यात पीएफआयच्या 56 ठिकाणांवर छापे टाकले होते. या छापेमारीदरम्यान एनआयएला महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

( हेही वाचा : आता कुठूनही करता येईल मतदान! १६ जानेवारीला ‘रिमोट ईव्हीएम’ प्रकल्पाचे प्रात्यक्षिक)

पीएफआय ठिकाणांवर शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण

पीएफआयच्या राज्य कार्यकारी समितीने सात सदस्य, विभागीय प्रमुख, १२ जिल्ह्यांमधील १५ शारीरिक प्रशिक्षक आणि ७ कॅडर यांच्या निवासस्थानांवर हे छापे टाकण्यात आले. पीएफआयच्या ठिकाणांवर लोकांना चाकू, तलवारी आणि इतर शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. अशी माहिती एनआयएच्या प्रवक्त्याने दिली. तसेच २० संशयितांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली आहे.

एर्नाकुलममध्ये १३, कन्नूरमध्ये ९, मलप्पुरममध्ये ७, वायनाडमध्ये ६, कोझिकोडमध्ये ४, तिरुवनंतपुरम, कोल्लम, पठाणथिट्टा आणि अलाप्पुझा येथे प्रत्येकी ३, त्रिशूर आणि कोट्टायमध्ये प्रत्येकी २, पलक्कडमध्ये एका ठिकाणी ही छापेमारी करण्यात आल्याचे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.