MLA Disqualification Case : निकालाचे काय होणार परिणाम? जाणून घ्या…

208
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या (MLA Disqualification Case) मुद्यावर बुधवार, १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अंतिम निर्णय देणार आहेत. हा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागणार कि ठाकरे गटाच्या बाजूने लागणार यावर उत्सुकता वाढली आहे. तसेच दोन्ही गटाची चिंता वाढली आहे. त्यामुळे या निर्णयाचे काय परिणाम होतील, यावर आता खल सुरु झाला आहे.
शिवसेना आमदार अपात्रता  (MLA Disqualification Case) प्रकरणी एकूण 34 याचिकांचा सहा गटात समावेश करून ही सुनावणी पार पडली. त्यानुसार, सहा गटांत निकाल वाचला जाणार आहे. सुमारे 200 पानांचा एक निकाल असून सहा गटांचा मिळून सुमारे 1200 पानांचे निकाल पत्र तयार करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालाचे एक ते दीड तास वाचन करणार आहेत.

या निकालातून कोणकोणत्या बाबी स्पष्ट होणार? 

  • पक्षांतर बंदी कायद्याची स्पष्टता होईल, याची नेमकी व्याख्या या प्रकरणाच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणातील मर्यादा स्पष्ट होतील.
  • अशा प्रकरणांमधील अध्यक्षांची कार्यकक्षा आणि अधिकार स्पष्ट दिसून येतील.
  • राजकीय पक्ष व विधीमंडळ पक्ष यांच्या कार्यकक्षा स्पष्ट होतील.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.