MLA Disqualification Case : कायद्याला धरूनच निर्णय घेतला जाईल – राहुल नार्वेकर

एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये बंड पुकारून भाजपशी युती केली आणि ते मुख्यमंत्री झाले. या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि याचिका दाखल केली. त्यावर आता बुधवार १० जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

157
MLA Disqualification Case : कायद्याला धरूनच निर्णय घेतला जाईल - राहुल नार्वेकर

माझ्या मतदारसंघातील किंवा राज्याशी निगडित प्रश्न सोडविणे हे माझे कर्तव्य आहे. अशा प्रश्नांसंदर्भात राज्यातील कार्यकारी मंडळातील मुख्य व्यक्तीशी संपर्क साधून जर का प्रश्न सोडवण्याची गरज असेल, तेव्हा मला कोणाला भेटण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही, असे सुनावतानाच (MLA Disqualification Case) आमदार अपात्रता प्रकरणात कुठेही कायद्याच्या तरतुदींची मोडतोड झालेली नाही. माझा निर्णय कायद्याला धरूनच असणार आहे, अशा शब्दांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या टीकेला उत्तर दिले आहे.

नेमकं काय म्हणाले राहुल नार्वेकर ?

आजचा म्हणजेच बुधवार १० जानेवारीचा आमदार अपात्रतेचा (MLA Disqualification Case) निकाल हा पूर्णपणे कायद्याला धरून असेल, यामध्ये कुठलीही त्रुटी राहणार नाही. तसेच आजचा निर्णय हा एक बेंच मार्क सेट करणारा निर्णय असेल.

(हेही वाचा – Pankaja Munde यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचा होणार ई-लिलाव)

कोणीही न्यायालयात गेले, तरी माझ्यावर दबाव पडणार नाही –

माझ्यावर सध्या बिनबुडाचे आरोप होतात, त्यावेळेला हे आरोप म्हणजे जी व्यक्ती निर्णय घेत असते तिच्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव किंवा दबाव टाकण्यासाठी असे आरोप केले जातात, असे नार्वेकर म्हणाले. परंतु, मी जो निर्णय (MLA Disqualification Case) घेणार आहे तो संविधानाच्या तरतुदीच्या आधारावर, १९८६ च्या नियमांच्या आधारावर, विधिमंडळाचे पायंडे, प्रथा-परंपरांचा विचार करून अत्यंत कायदेशीर निर्णय घेऊन जतनेला न्याय देणार आहे, अशी ग्वाही नार्वेकर यांनी दिली. तसेच या भेटीवरून कोणीही न्यायालयात गेले, तरी माझ्यावर दबाव पडणार नाही. मी जे करतो आहे ते अत्यंत कायदेशीररीत्या योग्य आहे. असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. (MLA Disqualification Case)

(हेही वाचा – Akshat Kalash Yatra in Shajapur : मशिदीसमोर अक्षत कलश यात्रेवर दगडफेक, परिसरात कलम १४४ लागू)

आज कोण कोणत्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे हे पाहूया –

शिवसेना शिंदे गटाचे १६ आमदार

१. एकनाथ शिंदे
२. चिमणराव पाटील
३. अब्दुल सत्तार
४. तानाजी सावंत
५. यामिनी जाधव
६. संदीपान भुमरे
७. भरत गोगावले
८. संजय शिरसाठ
९. लता सोनवणे
१०. प्रकाश सुर्वे
११. बालाजी किणीकर
१२. बालाजी कल्याणकर
१३. अनिल बाबर
१४. संजय रायमूळकर
१५. रमेश बोरनारे
१६. महेश शिंदे

(हेही वाचा – Ravindra Waikar : तब्बल १५ तास चालली वायकरांची चौकशी; १७ जानेवारीला हजर राहण्याची सूचना)

उद्धव ठाकरे गटाचे आमदार

१. अजय चौधरी
२. रवींद्र वायकर
३. राजन साळवी
४. वैभव नाईक
५. नितीन देशमुख
६. सुनिल राऊत
७. सुनिल प्रभू
८. भास्कर जाधव
९. रमेश कोरगावंकर
१०. प्रकाश फातर्फेकर
११. कैलास पाटील
१२. संजय पोतनीस
१३. उदयसिंह राजपूत
१४. राहुल पाटील

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.