Pankaja Munde यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचा होणार ई-लिलाव

काही दिवसांपूर्वी जीएसटी विभागाने वैद्यनाथ कारखान्यास १९ कोटी थकीत असल्याने नोटीस बजावली होती. त्यामुळे लोकसहभाग व लोकचळवळीतून १९ कोटी रुपये देण्याची तयारी कार्यकर्ते व समाज बांधवांनी केली होती. मात्र, पंकजा मुंडे यांनी यासाठी नकार दिला होता.

158
Pankaja Munde यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचा होणार ई-लिलाव

काही महिन्यांपूर्वी वैद्यनाथ साखर कारखाना संचालक मंडळाच्या २१ जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सर्व संचालक बिनविरोध निवडून आले होते. चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी जिल्हा उप निबंधक जाधव यांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यात (Pankaja Munde) पंकजा मुंडे यांची पुन्हा चेअरमन पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमन म्हणून चंद्रकांत कराड यांची निवड झाली.

(हेही वाचा – MLA Disqualification Case : ‘हे’ आमदार ठरणार का अपात्र ?)

अशातच आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचा येत्या २५ जानेवारी रोजी ई-लिलाव होणार आहे. युनियन बँकेने २०३ कोटींच्या कर्ज वसुलीसाठी कारखान्याला लिलावाची नोटीस बजावली आहे. २५ जानेवारीला कारखान्याचा ऑनलाइन लिलाव होणार असल्याचं नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे.

(हेही वाचा – रोहिंग्या-बांगलादेशी मुस्लिमांना भारतात घुसवणाऱ्या अबू सालेहला युपी ATSने केले गजाआड)

मागील काही वर्षांपासून हा कारखाना आर्थिक अडचणींमध्ये सापडला होता. त्यामुळे या कारखान्याच्या नावावर अनेक बँकेचे कर्ज झाले. यात युनियन बँकेच्या २०३ कोटींच्या कर्जाचा समावेश आहे. थकीत कर्जाची वसुली होत नसल्याने बँकेने आता नोटीस काढत कारखान्याचा लिलाव करण्याची जाहिरात काढली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

(हेही वाचा – MLA Disqualification Case : राहुल नार्वेकर खरचं निकाल जाहीर करतील ?)

काही दिवसांपूर्वी जीएसटी विभागाने वैद्यनाथ कारखान्यास १९ कोटी थकीत असल्याने नोटीस बजावली होती. त्यामुळे लोकसहभाग व लोकचळवळीतून १९ कोटी रुपये देण्याची तयारी कार्यकर्ते व समाज बांधवांनी केली होती. मात्र, पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी यासाठी नकार दिला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.