J P Nadda आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जागावाटपावर तासभर बैठक; अजित पवार अनुपस्थित

118
काही दिवसांत जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तासभर चर्चा झाली. ही चर्चा मुख्यतः जागा वाटपावर झाल्याचे सूत्रांची माहिती आहे. अशा प्रकारे राज्यात महायुतीची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यावर आल्याचे समजते. मात्र या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार अनुपस्थित होते.

भाजप राज्यात ३२ जागा लढवणार

सध्या जे पी नड्डा  (J P Nadda) हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्याअंतर्गत बुधवारी त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतही बैठक पार पडली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीत जेपी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली. तासभर झालेल्या या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली.  भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रवीण दरेकरही यावेळी उपस्थित होते. महायुती म्हणून कशा प्रकारे आगामी निवडणुकांत लढले पाहिजे तसेच जनतेच्या आणि विकासकामांबाबत चर्चा झाली झाली. त्याआधी महायुतीच्या नेत्यांमध्ये स्नेहभोजन झाले. पण या बैठकीला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एकही नेता उपस्थित नव्हता. त्यामुळे महायुतीमध्ये जागावाटपासंदर्भातील तिढा सुटणार का? याची राजकीय चर्चा सुरु आहे. दरम्यान भाजप राज्यात ३२ जागा लढवणार आहे, असे ठरल्याचे सूत्रांची माहिती आहे. एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट किती जागा लढवणार यावर अद्याप निर्णय झाला नाही. लवक्ररच महायुतीच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा होईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.