Yashasvi Jaiswal चा तंबूतून ५ कोटींच्या अलिशान घरापर्यंतचा प्रवास; वांद्र्यात खरेदी केले घर

यशस्वी सुरुवातीला एका दुधाच्या डेअरीमध्ये राहिला. त्यानंतर मैदानात काम करणाऱ्या माळी काकांबरोबर तंबूत राहिला होता.

265
गरिबांचे नशीब कधी फळेल सांगता येत नाही. भारतीय क्रिकेट संघात आज सर्वांच्या तोंडावर नाव एकाच खेळाडूचे आहे. तो म्हणजे यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) ! वयाच्या २३व्या वर्षी यशस्वी तुफान फलंदाजी करत आहे. त्याने या वयापर्यत ज्यांनी ज्यांनी रेकॉर्ड केले ते रोहित शर्मा, विराट कोहली यांचे रोकॉर्ड मोडले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावारूपाला येत असलेला यशस्वी हा मुंबईत जेव्हा स्ट्रगल करत होता तेव्हा तंबूत राहत होता. आता त्याने याच मुंबापुरीत वांद्रे येथे तब्बल ५ कोटींचे घर खरेदी केले आहे.

मैदानात काम करणाऱ्या माळ्यासोबत राहिला 

यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने नुकतीच इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने लागोपाठ दोन सामन्यात द्विशतक ठोकण्याचा पराक्रम केला. यशस्वीच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारताने मालिकेत आघाडी घेतली आहे. यशस्वीच्या आयसीसी क्रमवारीतही मोठा बदल झाला आहे. अवघ्या सात सामन्यात त्याने आघाडीच्या 15 खेळाडूंमध्ये स्थान पटकावले आहे. यशस्वी जयस्वालची एकामागून एक स्वप्न पूर्ण होत आहेत. अतिशय कठीण परिस्थित सुरु केलेला त्याचा प्रवास यशापर्यंत पोहचलाय. यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) ज्यावेळी मुंबईत आला, त्यावेळी त्याच्याकडे राहायला घर नव्हते. खिशात पैसाही नव्हता. यशस्वी सुरुवातीला एका दुधाच्या डेअरीमध्ये राहिला. त्यानंतर मैदानात काम करणाऱ्या माळी काकांबरोबर तंबूत राहिला होता. पण अथक परीश्रमाच्या जोरावर यशस्वीने आपले स्थान निर्माण केले. क्रिकेटमध्ये यशाची चव चाखल्यानंतर त्यानं आता मुंबईत स्वप्नातील घर घेतले आहे.

एक हजार चौ. फुटाचे घर घेतले 

वांद्र्यातील उच्चभ्रु परिसरात यशस्वी जयस्वाल याने 5 कोटी 34 लाख रुपयांच्या किंमतीमध्ये घर खरेदी केले आहे. हे अलिशान घर 1110 स्क्वेअर फूट इतके प्रशस्त आहे. 7 जानेवारी 2024 रोजी घराचे रजिस्ट्रेशन झाले. इतर प्रक्रिया सुरु आहे. लवकरच तो नव्या घरात राहायला जाऊ शकतो. हे नवे घर वांद्रे-कुर्ला संकुलाजवळ (बीकेसी) आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.