पालघर (Palghar) जिल्ह्यात सध्या धर्मांतराच्या मुद्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. कथित धर्मांतराविरोधात हिंदू संघटना आक्रमक झाल्या असताना, २९ सप्टेंबरला धर्मांतरणास पाठिंबा देणाऱ्या संघटनांनी जिल्ह्यात मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. विशेष बाब म्हणजे, या मोर्च्याला प्रशासनाकडून परवानगीही मिळाली असल्याचे कळते. ज्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
पालघर (Palghar) जिल्ह्यातील अनधिकृत ख्रिश्वन प्रार्थनास्थळांवर त्वरित कारवाई करावी आणि राज्यात धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा.– स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज
या परवानगीमुळे संतप्त नागरिक व हिंदू संघटनांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेक संघटनांनी मोर्चाच्या विरोधात मोहीम सुरू केली असून, त्याने तणावाचे रूप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर या मोर्च्यांच्या विरोधात भडकावू पोस्ट्स व्हायरल होत असून, स्थानिक पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हिंदू संघटनांचा आक्रमक पवित्रा हिंदुत्ववादी संघटनांनी आरोप केला आहे की, जिल्ह्यातील काही ख्रिश्चन मिशनरी संस्था फसवणूक, आर्थिक अमिष आणि अंधश्रद्धांच्या माध्यमातून गरीब व आदिवासी समाजात धर्मांतरण करत आहेत. या पार्श्वभूमीवर या आधीच ‘संस्कृती रक्षण समिती’ने १२९ अनधिकृत ख्रिश्चन प्रार्थनास्थळांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करत त्वरित कारवाईची मागणी केली आहे. (Palghar)
संस्कृती रक्षण समिती आरोपांच्या नावाखाली आमच्या प्रार्थनास्थळांवर हमले थांबवा. आम्हाला सुरक्षितता द्या.
– प्रतिनिधी, स्थानिक ख्रिश्चन समुदाय.
संघटनांचा ठाम आग्रह आहे की, अशा प्रार्थनास्थळांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी आणि महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्यात यावा. स्थानिक ख्रिश्चन समुदायाने आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, “धर्मांतराच्या खोट्या आरोपांच्या नावाखाली आमच्यावर अन्याय होत आहे. आमची उपासना स्थळ आणि आमच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येऊ नये, यासाठी प्रशासनाने निष्पक्ष भूमिका घ्यावी.” सध्या जिल्ह्यातील (Palghar) काही गावांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी हिंदू आणि ख्रिश्चन गटांमध्ये तोंडओळखीवरून वाद झाले असल्याचे स्थानिक सूत्रांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर २९ सप्टेंबर रोजी होणारा मोर्चा हा प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. २९ सप्टेंबर रोजीच्या मोर्चाला परवानगी दिल्यानंतर आता प्रश्न उपस्थित होतो आहे, प्रशासन यावर काय भूमिका घेणार? परिस्थिती बिघडण्याआधी मोर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतला जातो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हिंदू संघटनांची काय आहे भूमिका?
- पालघरमधील (Palghar) १२९ अनधिकृत ख्रिश्चन प्रार्थनास्थळांवर कारवाईची मागणी
-
हिंदू संघटनांचा आरोपः फसवणूक, अमिष व अंधश्रद्धांद्वारे धर्मांतर
-
‘संस्कृती रक्षण समिती’ कडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
-
धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची जोरदार मागणी
-
मोर्चाला अनुमती दिल्याने सोशल मीडियावर संताप
-
पोलीस प्रशासनासाठी कायदा-सुव्यवस्थेचे मोठे आव्हान
Join Our WhatsApp Community


