Pune Airport वर प्रवाशांचा प्रवास सुखकर; एरोमॉलसाठी आठ गोल्फ कार्ट दाखल

8
Pune Airport वर प्रवाशांचा प्रवास सुखकर; एरोमॉलसाठी आठ गोल्फ कार्ट दाखल

Pune Airport          पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलपासून एरोमॉलपर्यंत प्रवाशांच्या सोयीसाठी आता आठ गोल्फ कार्टची (लहान इलेक्ट्रिक वाहन) सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच लहान मुलांसह प्रवाशांचा सुमारे ४०० मीटरचा प्रवास अधिक सुखकर आणि जलद होणार आहे. पुणे विमानतळावर गेल्या काही दिवसांत प्रवाशांची तसेच विमानांची संख्या वाढत आहे. (Pune Airport)

पुण्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांना नवीन टर्मिनलवरून एरोमॉलमध्ये जाण्यासाठी यापूर्वी तीन गोल्फ कार्ट उपलब्ध होत्या. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन विमानतळ प्रशासनाने नुकत्याच तीन नवीन गोल्फ कार्ट खरेदी केल्या आहेत. नवीन गोल्फ कार्ट पूर्वीच्या तुलनेत मोठ्या असून, त्यामधून एकाच वेळी सात ते आठ प्रवाशांची वाहतूक करता येत आहे. (Pune Airport)

(हेही वाचा – BMC: १४ फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या झोपड्यांवर कारवाई, मुंबई महापालिकेची १ ऑक्टोबरपासून विशेष मोहीम)

याशिवाय एरोमॉल प्रशासनाकडेही दोन गोल्फ कार्ट उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवाशांना नवीन टर्मिनलपासून एरोमॉलपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. नवीन टर्मिनलवरून एरोमॉलकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने गोल्फ कार्टसोबत बसचाही वापर केला जात आहे. गोल्फ कार्टची संख्या वाढल्याने प्रवाशांचा प्रतीक्षेचा वेळ कमी झाला असून, टर्मिनलबाहेरील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासही मदत होत आहे. (Pune Airport)

“नवीन टर्मिनलवरून एरोमॉलकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. प्रवाशांना जलद एरोमॉलपर्यंत पोहोचता यावे, याकरिता गोल्फ कार्ट व बसचा वापर केला जात आहे. गोल्फ कार्टची संख्या वाढविल्याने प्रवाशांचे वेटिंग कमी झाले आहे. शिवाय टर्मिनलबाहेरील गर्दीचे व्यवस्थापनही चांगल्या प्रकारे होत आहे,” अशी माहिती एरोमॉलचे उपाध्यक्ष युवराजसिंग राजपूत यांनी दिली. (Pune Airport)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.