Railway : मुंबईत रेल्वे प्रवाशांची गर्दी होणार कमी; काय आहे रेल्वेचा खास प्लॅन?

मुंबई लोकलमधून (Railway) तुडूंब भरून लोकल धावतात. यातच आता नियमित रेल्वेगाड्यांसह दिवाळी, छटपूजा निमित्त १,२०० विशेष गाड्यांची भर पडणार आहे.

213

मुंबईतील गर्दी विभागण्यासाठी रेल्वे मंडळाने मान्य केलेल्या प्रस्तावानुसार भारतीय रेल्वेने पहिल्यांदाच रिंग रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष रेल्वे (Railway) लखनऊमधील गोमतीनगर ते मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) स्थानकांना जोडून पर्यायी मार्गाने पुन्हा गोमतीनगरला पोहोचेल. प्रथमच ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये न येता मुंबईबाहेरील अर्थात कल्याण, पनवेलहूनच परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे.

मुंबई लोकलमधून (Railway) तुडूंब भरून लोकल धावतात. यातच आता नियमित रेल्वेगाड्यांसह दिवाळी, छटपूजा निमित्त १,२०० विशेष गाड्यांची भर पडणार आहे. यामुळे मुंबईतील टर्मिनसवरील गर्दी कमी करण्यासाठी मुंबई बाहेर रेल्वेगाड्या थांबवून त्याच ठिकाणाहून परतीच्या प्रवासासाठी गाड्या धावणार आहेत. (Railway)

(हेही वाचा अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही? SIT ला High Court चा जाब)

विशेष गाडी क्रमांक ०५०३७ गोमती नगर – पुणे- पनवेल – गोमती नगर ही विशेष रेल्वे २७ सप्टेंबर, ४ ऑक्टोबर, ११ ऑक्टोबर आणि १८ ऑक्टोबर रोजी धावणार आहे. गोमतीनगरपासून सुरू होणारी गाडी कानपूर, झांसी, भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ, मनमाड, अहिल्यानगर, दौंड मार्गे पुण्याला पोहोचेल. त्यानंतर चिंचवड, लोणावळा येथे पोहोचेल. मुंबई महानगरातील कर्जत, पनवेल, कल्याण येथे थांबून नाशिक-इगतपुरीमार्गे रवाना होईल. (Railway)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.