Ladakh Violence : परदेशी निधी थांबविल्यानंतर आता Sonam Wangchuk यांना एनएसए अंतर्गत अटक

Ladakh Violence :          लडाखमधील हिंसाचार(Ladakh Violence) भडकविल्याप्रकरणी सोनम वांगचुक यांना एनएसए अंतर्गत अटक करण्यात आली आहे. अटकेआधीच वांगचुक यांच्या एनजीओचा एफसीआरए परवाना रद्द करण्यात आला.

227

Ladakh Violence :          लडाखमधील हिंसाचार(Ladakh Violence) भडकविल्याप्रकरणी सोनम वांगचुक यांना एनएसए अंतर्गत अटक करण्यात आली आहे. अटकेआधीच वांगचुक यांच्या एनजीओचा एफसीआरए परवाना रद्द करण्यात आला. लडाखची राजधानी लेह येथे झालेल्या हिंसाचारा(Ladakh Violence)नंतर प्रशासनाने महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे.(Ladakh Violence)

(हेही वाचा Navi Mumbai Airport : …अखेर मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी होणार पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन )

दरम्यान, लेह येथे झालेल्या हिंसक संघर्षानंतर प्रशासनाने महत्त्वपूर्ण कारवाई केली असून सोनम वांगचुक यांना शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५ राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. वांगचुक यांच्यावर निदर्शकांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे. या चिथावणीखोर वर्तणुकीमुळे लेहमध्ये हिंसाचार झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.(Ladakh Violence)

(हेही वाचा संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान: MiG-21 Retirement; नंतरही भारत रशियाबद्दल केले मोठे विधान )

सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या एक दिवस आधी, त्यांच्या संघटनेचा म्हणजेच, स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख(SECMOL) एफसीआरए परवाना देखील रद्द करण्यात आला. कोणत्याही संस्थेला परदेशी निधी मिळविण्यासाठी एफसीआरए परवाना आवश्यक आहे. त्यामुळे आता लेहमधील निदर्शनांनंतर अधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलले.(Ladakh Violence)

हिंसाचारानंतर तणाव वाढला

बुधवारी (२४ सप्टेंबर २०२५) दोन दिवसांपूर्वी लेहमध्ये पूर्ण राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मोठा निषेध करण्यात आला. या निषेधादरम्यान हिंसाचार झाला होता. ह्यात चार जणांचा मृत्यू झाला असून ९० जण जखमी झाले.(Ladakh Violence)

हिंसाचारानंतर, गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ ला लेह शहरात पोलीस आणि निमलष्करी दलांनी कडकपणे कर्फ्यू लागू केला. या घटनेसंदर्भात पोलिसांनी आतापर्यंत सुमारे ५० जणांना ताब्यात घेतले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, कर्फ्यू असलेल्या भागातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. वांगचुक यांनी आपले उपोषण अर्ध्यावरच सोडून दिले होते. त्यानंतर रुग्णवाहिकेतून आपल्या गावी पळून गेले होते.(Ladakh Violence)

सोनम वांगचुक यांनी लेह हिंसाचाराच्या आधी पंधरा दिवसांचे उपोषण केले होते. हिंसाचार सुरू झाल्यानंतर, सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण अर्ध्यावरच सोडून दिले आणि रुग्णवाहिकेतून आपल्या गावी पळून गेले. परिस्थिती लक्षात घेता, लेह जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी २६-२७ सप्टेंबरदरम्यान सर्व सरकारी आणि खाजगी शाळा, महाविद्यालये व अंगणवाडी केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.(Ladakh Violence)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.