Maratha Reservation : छगन भुजबळांमागे कोण मास्टरमाईंड? मनोज जरांगे यांनी दिले हटके उत्तर; म्हणाले…  

135

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावरून महाराष्ट्रातले राजकीय वातावरण तापले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतले आहे. त्यानंतर आता मराठा समाजाला वेगळे  आरक्षण द्यावे. त्यांना ओबीसीतून आरक्षण दिले जावू नये, अशी आक्रमक भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. भुजबळ यांच्या विधानावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवे आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळेल, असा विश्वासही मनोज जरांगेंनी व्यक्त केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

यावेळी छगन भुजबळांमागे मास्टरमाइंड कोण आहे? असा सवाल विचारला असता मनोज जरांगेंनी हटके उत्तर दिले. आयला हे लफडं, मला नाही कळायचं.. ब्वा.. इतक्या लांब आपलं जुळू शकतं नाही. तेच एवढे मोठे मास्टरमाइंड आहेत आणि आता त्यांच्यामागे कोण मास्टरमाइंड असेल? ते कुणाला मास्टरमाइंड म्हणून टिकू देतील, असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली.

(हेही वाचा CM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवला)

छगन भुजबळ काय म्हणाले होते?

मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) मी किंवा माझ्या पक्षाने तसेच समता परिषदेने कधीही विरोध केलेला नाही. पण आम्ही पहिल्यापासून हे निश्चितपणे म्हणालो आहोत की मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागता कामा नये. वेगळे आरक्षण त्यांना द्या, सर्वोच्च न्यायालयात ज्या त्रुटी असतील त्या दूर करा आणि मराठा बांधवाना आरक्षण द्या असे आता छगन भुजबळ यांनी म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.