आठ तासांच्या चौकशीनंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना अटक

123

कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयने याप्रकरणी मनीष सिसोदिया यांना चौकशीसाठी रविवारी बोलावले होते. आठ तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने त्यांना अटक केली आहे.

माहितीनुसार, सीबीआयने मनीष सिसोदिया यांची चौकशी करण्यासाठी विस्तृत प्रश्न संच तयार केला होता. तसेच त्यांच्या चौकशी दरम्यान सीबीआय मुख्यालयाच्या परिसरात पोलिसांनी कलम १४४ लागू केले होते.

चौकशीपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिसोदिया यांच्या अटकेबाबत मोठा दावा केला होता. ते ट्वीट करून म्हणाले होते की, ‘मनीष सिसोदिया तुमच्यासोबत ईश्वर आहे. लाखो मुले आणि त्यांच्या पालकांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. जेव्हा तुम्ही देश आणि समाजासाठी जेलमध्ये जाता तेव्हा ते दुर्गुण नसून गौरव आहे. लवकरच तुम्ही तुरुंगातून परत येवो, अशी मी ईश्वराला प्रार्थला करतो. दिल्लीची मुले, पालक आणि आम्ही सर्व तुमची वाट पाहत आहोत.’

नेमके प्रकरण काय?

गतवर्षी २०२२ साली दिल्ली सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले होते. याच धोरणामुळे कोट्यावधींची उलाढाला होईल. शिवाय मद्य माफियांवर अंकुश बसेल, असा विश्वास केजरीवाल सरकारला होता. सर्व सरकारी आणि खासगी दारूची दुकाने बंद करून या धोरणाअंतर्गत नवीन निवादा जारी केल्या होत्या. मात्र या नवीन धोरणामुळे सर्व दुकाने खासगी व्यावसायिकांच्या ताब्यात गेली. त्यामुळे यावर दिल्लीच्या उपराज्यपालांनी आक्षेप घेतला आणि यात गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.