मुंबई पालिकेतील १२ हजार कोटींच्या कामात गैरव्यवहार; कॅगच्या अहवालातील निष्कर्ष

77

मुंबई पालिकेतील १२ हजार कोटींच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा निष्कर्ष कॅगच्या अहवालातून काढण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी हा अहवाल विधानसभा सभागृहात सादर केला.

या अहवालाबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या कामाचे कॅगकडून ऑडिट करण्यात आले आहे. त्यातून निधीचा गैरवापर झाल्याचे समोर आले आहे. विशेष करून कोरोनाकाळात केलेल्या कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसून आला आहे. ‘कॅगचा हा अहवाल ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे’, असा इशाराही यावेळी फडणवीस यांनी दिला.

मुंबई महापालिकेच्या २ विभागांची २० कामे टेंडरशिवाय देण्यात आलेली आहेत. माहिती तंत्रज्ञान विभागात निविदा न मागवताच टेंडर देण्यात आले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कामांचे बजेट वाढविण्यात आलेले आहे. रस्ते आणि वाहतूकमध्ये ५१ कामे सर्व्हेशिवाय केली आहेत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

२१४ कोटींची कामे टेंडरशिवाय

  • मुंबई महापालिकेतील २१४ कोटींची कामे टेंडरशिवाय करण्यात आली आहेत. ६४ ठेकेदार आणि महापालिकेमध्ये करार झालेले नाहीत. सॉलिड वेस्टच्या कामात पालिकेकडून हलगर्जीपणा केल्याचे अहवालात म्हटले आहे.
  • शहरातील मिठी नदीच्या प्रदूषणाबाबतची कामे ४ ऐवजी एकाच कंत्राटदाराला देण्यात आली. अशी एकूण १२ हजार कोटींच्या कामाची चौकशी करण्यात आली आहे. यात निधीचा निष्काळजीपणाने वापर करण्यात आल्याचे आढळून आले आहे.
  • तसेच मान्यता नसताना पालिकेने कामे दिल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणत्याही कराराशिवाय कामे केल्याने महापालिकेला कारवाई करण्याचा अधिकार नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

(हेही वाचा – लोकायुक्त कायदा जुलैपर्यंत रखडला; बहुमत नसल्याने सत्ताधाऱ्यांची अडचण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.