Sharad Pawar महायुतीचे ‘चक्रव्यूह’ भेदणार की अडकून राहाणार?

पश्चिम बंगालमध्ये भाजपा याच चक्रव्युहात अडकला आणि सत्तेने हुलकावणी दिली..

140
Sharad Pawar महायुतीचे ‘चक्रव्यूह’ भेदणार की अडकून राहाणार?
  • सुजित महामुलकर

भारतीय जनता पार्टी (भाजपा), शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार यांना बारामतीच्या ‘चक्रव्युहा’त बंदिस्त केले का? (Sharad Pawar)

पवार त्यांच्याच गडात बंदीस्त?

बारामती लोकसभा मतदार संघ हा शरद पवार यांचा ‘गड’ समजला जातो. राज्यातील महायुतीने शरद पवार यांना या गडातच बंदिस्त करण्याचा डाव आखला आहे का? असा प्रश्न राज्यातील जनता विचारू लागली आहे. (Sharad Pawar)

बारामती पवारांची प्रतिष्ठा

याचे कारण, पवार यांची कन्या आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या बारामतीतून लोकसभेच्या उमेदवार आहेत. सुप्रिया यांच्यासमोर त्यांच्या भावजय आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार असणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे बारामती मतदार संघ जिंकणे, हा शरद पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय झाला, यात शंका नाही. (Sharad Pawar)

(हेही वाचा – MLA Bachu Kadu: अमरावतीची जागा भाजपाला जाताच, बच्चू कडूंनी दिलं ‘हे’ उत्तर)

बारामतीच्या फेऱ्या वाढल्या

आता, स्वतःचे अस्तित्व राखायचे की महाविकास आघाडीचे, हा यक्षप्रश्न पवार यांच्यापुढे उभा ठाकला असेल. पवार यांनी आपल्या कन्येसाठी बारामतीत तळ ठोकला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बारामतीच्या फेऱ्याही वाढल्या असून राजकारणावर कधीही प्रतिक्रिया न देणारे त्यांचे जवळचे नातेवाईकही अजित पवार यांच्या विरोधात आणि शरद पवार यांच्या बाजूने मते मांडू लागल्याचे दिसते. (Sharad Pawar)

ममता पराभूत पण सत्ता कायम

पश्चिम बंगालमध्ये २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत ममता बॅनर्जी यांना गेल्या तीन दशकातील सर्वाधिक म्हणजेच ४८ टक्के मते मिळाली. मात्र त्या स्वतः नंदीग्राम या मतदार संघातून केवळ २,००० मतांच्या फरकाने पराभूत झाल्या. त्यांना स्वतःच्या पराभवाचा अंदाज होता, तरी त्या नंदीग्राममधून निवडणूक लढल्या कारण मतदार संघ हा राज्याच्या एका टोकाला असल्याने भाजपाने या मतदार संघावर पूर्ण लक्ष केंद्रित केले होते. तसेच भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी याच मतदार संघात ममतांना पराभूत करण्यासाठी शक्ती पणाला लावली आणि तिथेच ममतांनी बाजी मारली. (Sharad Pawar)

(हेही वाचा – Sports Bike Under 2 Lakhs : ‘या’ स्पोर्ट्स बाईक आहेत ताकदीने सर्वोत्तम आणि किमतीने किफायतशीर)

… तर भाजपाने सोडलेल्या तीन जागाही जिंकणे कठीण

शरद पवार यांच्या भाषणाचा करिश्मा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने पहिला आहे. भर पावसातील एका भाषणाने भाजपाचे फार मोठे नुकसान केले, हे भाजपा नेतेही खासगीत मान्य करतात. आता तर काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची भिस्त पवार यांच्यावर आहे. प्रचारात पवार यांचे योगदान नसेल तर महाविकास आघाडीला भाजपाने सोडलेल्या तीन जागाही (भाजपाचा ४८ पैकी ४५ जागांचा दावा) जिंकणे कठीण होईल. (Sharad Pawar)

रणनितीचा भाग

भाजपाला नंदीग्राममध्ये व्यस्त ठेवण्याची रणनिती प्रशांत किशोर यांची होती, असे सांगण्यात येते. आता तीच रणनिती भाजपाने वापरुन शरद पवार यांना बारामतीच्या ‘चक्रव्युहा’त अडकवण्याची योजना आखल्याचे बोलले जात आहे. आता हे चक्रव्यूह पवार भेदून बाहेर पडतात की त्यातच अडकून राहतात, हे लोकसभा निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. (Sharad Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.