Maharashtra Politics : शरद पवार-उद्धव ठाकरे भेटीवर शिंदे गटाचा गौप्यस्फोट

थोड्या दिवसांनी संजय राऊत कपडे फाडून रस्त्यावर धावणार आहेत, असा टोला म्हस्के लगावला. 

197
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट

राज्यात सध्या राजकीय पातळीवर अनेकविध चर्चा होत आहेत, राष्ट्रवादीत फूट पडणार आहे, राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा गट भाजपाला मिळणार आहे, अजित पवार बंड पुकारणार आहे, अशा चर्चा सुरु राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) असतानाच उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला गेले, त्यामुळे चर्चेला आणखी उधाण आले, यावरून आता शिंदे गटाने धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

(हेही वाचा “त्यांच्या बोलण्यावरून मविआ नसावी किंवा तुटावी…” शरद पवारांच्या त्या विधानावर राऊतांनी दिले स्पष्टीकरण)

शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पवार-उद्धव यांच्या भेटीवर बोलताना म्हटले की, उद्धव ठाकरे हे आम्ही आमचा मुख्यमंत्री पदावरील दावा मागे घेत आहोत, असे सांगण्यासाठी शरद पवार यांना भेटायला गेले होते, असे म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावी गेल्याने त्यावर संजय राऊत यांनी टीका केली होती. याला शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्यूत्तर दिले. मुख्यमंत्री सुट्टीवर नाहीत तर शासकीय दौऱ्यावर गेले आहेत. शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांची भेट घेतली आहे. त्यांच्या गावी पूजा आहे तिला उपस्थित राहण्यासाठी ते गेले आहेत. एक दिवस मुख्यमंत्री गावी गेले असतील आणि तिथून पण काम करत असतील तर संजय राऊतांनी अडीच वर्षे तत्कालीन मुख्यमंत्री दालनात कधी गेले नाहीत, कधी मंत्रालयात बसले नाहीत, कधी दौरा केला नाही त्यावर का गप्प बसलेले, अशी टीका म्हस्के यांनी केली. राज्याच्या राजकारणावर  (Maharashtra Politics) बोलण्यासाठी रोज सकाळी उठायचे आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांविरुद्ध बोलायचे. सत्तासंघर्षाचा निर्णय कोण देणार आहे? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यांना माहिती पडला आहे का? न्यायालयाने यांना सांगितले आहे का? तुम्ही बघा थोड्या दिवसांनी ते त्यांचे कपडे फाडून रस्त्यावर धावणार आहेत, असा टोलाही म्हस्के लगावला.

(हेही वाचा Maharashtra Political Crisis Supreme Court: …म्हणून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळाले – कपिल सिब्बल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.