Lok Sabha Poll 2024: निवडणुकीदरम्यान गैरव्यवहार होत असल्यास तक्रार कशी कराल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…

202
Lok Sabha Poll 2024: निवडणुकीदरम्यान गैरव्यवहार होत असल्यास तक्रार कशी कराल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...
Lok Sabha Poll 2024: निवडणुकीदरम्यान गैरव्यवहार होत असल्यास तक्रार कशी कराल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...

लोकसभा निवडणूक २०२४चे (Lok Sabha Poll 2024) वेळापत्रक जाहीर झाले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हे वेळापत्रक पत्रकार परिषदेत जाहीर झाले. निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीसाठी विशेष तयारी सुरू आहे. निवडणुकीदरम्यान उमेदवाराकडून गैरव्यवहार होत असल्यास किंवा पैशांचे आमिष दाखवत असल्याचे लक्षात आल्यास नागरिक केवळ घरी बसून त्याचा फोटो आणि संदेशासह तक्रार दाखल करू शकतात. जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया काय आहे.

पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रमाबरोबरच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मतदारांना विशेष आवाहन केले. मतदार त्यांचा मतदान केंद्र क्रमांक कसा तपासू शकतात हे त्यांनी स्पष्ट केले. इतकेच नाही, तर जर एखादा उमेदवार पैशाचे आमिष दाखवत असेल किंवा वाटप करत असेल तर तो त्याबद्दल तक्रार करू शकतो. कोणताही मतदार सीव्हीजिल अॅपद्वारे आपली तक्रार नोंदवू शकतो. या अॅपच्या माध्यमातून नागरिक तक्रारी कशा दाखल करू शकतात हे सीईसीने स्पष्ट केले.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, फोटोसह तक्रार दाखल केल्यानंतर निवडणूक आयोगाद्वारे घडलेल्या घटनेचे लोकेशन ट्रेस केले जाते. मोबाईल लोकेशनद्वारे संपर्क करण्यात येईल. यामुळे १०० मिनिटांच्या आत निवडणूक आयोगाचे विशेष पथक अशा घटनांसंदर्भात कारवाई करण्यास सज्ज होईल.

(हेही वाचा – Bharat Jodo Nyay Yatra : शिवाजी पार्ककरांचा श्वास गुदमरला)

‘cVIGIL’ भारत निर्वाचन आयोग (Election Commission of India)कडे तक्रार कशी कराल?
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, निवडणुकीदरम्यान नागरिकांना अयोग्य सूचना, पैशाचे आमिष दाखवून मतदान करायला भाग पाडणं, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणे, अयोग्य बाहुबल, चुकीची माहिती यासारख्या समस्या सोडवण्यासाठीही निवडणूक आयोग वचनबद्ध आहे. ते म्हणाले की, नागरिकांना काही तक्रार असल्यास ते सीव्हीजिल अॅपद्वारे ‘cVIGIL’तक्रार करू शकतात. यासाठी हे अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे. या अॅपद्वारे जिथे जिथे पैशाच्या वाटपाचे प्रकरण किंवा निवडणूक मतदान प्रलोभन दाखवल्याचे लक्षात आल्यास तात्काळ फोटो आणि मजकूर लिहून या अॅपद्वारे तक्रार करता येते.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवडणुकांवर लक्ष केंद्रित
मुख्य निवडणूक आयुक्तांनी देशातील निवडणुकांच्या पर्वाचे वर्णन करताना सांगितले की, “देशभरात होणारी लोकसभा निवडणुका घेणे हे एक मोठे आव्हान आहे. परंतु आयोगाने गेल्या दोन वर्षांत मोठी तयारी केली आहे. आम्ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवडणुकांवर लक्ष केंद्रित करू. लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही निवडणुकीत पैशाचा आणि इतर गैरव्यवहार रोखण्यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.