South Mumbai Lok Sabha Constituency मध्ये लोढा आणि नांदगावकरच ठरु शकतात उमेदवार

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाची जागा कुणाला सोडली जाईल याबाबत भाजपा आणि शिवसेना युती सोबत मनसेची चर्चा सुरू असली तरी निवडणुकीची तारीख जाहीर झाली तरी जागा कुणाला सोडली जावी याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही.

196
South Mumbai Lok Sabha Constituency मध्ये लोढा आणि नांदगावकरच ठरु शकतात उमेदवार

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाची (South Mumbai Lok Sabha Constituency) जागा कुणाला सोडली जाईल याबाबत भाजपा आणि शिवसेना युती सोबत मनसेची चर्चा सुरू असली तरी निवडणुकीची तारीख जाहीर झाली तरी जागा कुणाला सोडली जावी याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. परंतु या मतदार संघातून भाजपाकडून विद्यमान पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि मनसे नेते बाळा नांदगावकर हेच विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना टक्कर देऊ शकतात असे बोलले जातात. त्यामुळे भाजपासमोर मंगल प्रभात लोढा आणि मनसेचे बाळा नांदगावकर निवडणूक रिंगणात उतरल्यास सावंत यांना जड जाणार असून अन्य कुणी उभे राहिल्यास सावंत यांचा विजयाचा मार्ग सुकर होईल असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. (South Mumbai Lok Sabha Constituency)

दक्षिण मुंबईत लोकसभा मतदार संघातील (South Mumbai Lok Sabha Constituency) जागा वाटपासह उमेदवारांच्या निवडीचा तिढा वाढतच चालला आहे. मनसेला ही जागा सोडल्यास त्यांच्या उमेदवाराने भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी अशाप्रकारची सूचना झाल्याने मनसे आणि भाजपामध्ये अजुनही एकमत झाल्याचे पहायला मिळत नाही. त्यातच आता हा मतदार संघ शिवसेनेला मिळावा यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना स्वाक्षरीचे निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये उपविभाग प्रमुख, महिला विभाग प्रमुख आदींसह शाखाप्रमुख, महिला शाखाप्रमुख आदींनी स्वाक्षरी केल्या आहे. त्यामुळे या मतदार संघावर आता शिवसेनेनेही दावा केला आहे. शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील विभाग प्रमुख व माजी स्थाय समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा मतदार संघ कोणत्याही परिस्थितीत भाजपा आणि मनसेला जाऊ नये यासाठी हा प्रयत्न सुरु आहे. (South Mumbai Lok Sabha Constituency)

(हेही वाचा – JEE Main 2024: जेईई परीक्षा एप्रिल महिन्यात होणार, परीक्षेची सिटी स्लिप लवकरच जारी; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा)

मनसेचे बाळा नांदगावकर हे संभाव्य उमेदवार

मात्र, हा मतदार संघ शिवसेनेला सोडल्यास तसेच यशवंत जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्यास अरविंद सावंत यांना प्रचार करण्याचीही गरज भासणार नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे. भाजपाचे या मतदार संघातील संभाव्य उमेदवार म्हणून राहुल नार्वेकर हे मतदार संघ बांधणीला लागले असले तरी त्यांच्या विरोधात वातावरण जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजपाकडून मंगल प्रभात लोढा हेच या मतदार संघातून सावंत यांच्यापुढे आव्हान निर्माण करू शकतात असे स्थानिक रहिवाशांसह राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. (South Mumbai Lok Sabha Constituency)

मात्र, भाजपाने हा मतदार संघ सोडल्यास मनसेचे बाळा नांदगावकर हे संभाव्य उमेदवार आहेत. त्यामुळे यापूर्वी बाळा नांदगावकर यांनी या मतदार संघातून इंजिन चिन्हावर निवडणूक लढवलेली असल्याने भाजपाने जर योग्यप्रकारे भाजपाचे इंजिन चिन्हाबाबत लोकांमध्ये अधिक प्रभावीपणे पोहोचण्याचा प्रयत्न केल्यास मनसे उमेदवाराचा विजय सुकर जाऊ शकतो आणि नांदगावकर निवडणूक रिंगणात उभे राहिल्यास सावंत यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण होऊ शकते. त्यामुळे सावंत यांना हॅट्रीक करण्यापासून रोखण्यात मनसे आणि भाजपा शिवसेना युती यशस्वी ठरेल असेही राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. (South Mumbai Lok Sabha Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.