Bharat Jodo Nyay Yatra : शिवाजी पार्ककरांचा श्वास गुदमरला

बॅनर आणि फलकांच्या जाहिरातबाजीने परिसर टाकला व्यापून

1366
Bharat Jodo Nyay Yatra : शिवाजी पार्ककरांचा श्वास गुदमरला

भारत जोडो न्याय यात्रेचा (Bharat Jodo Nyay Yatra) समारोप दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होत असल्याने राहुल गांधी यांच्या स्वागत करणाऱ्या बॅनर व फलकांनी हा संपूर्ण परिसर भरून गेला आहे. छत्रपती शिवाजी छत्रपती महाराज मैदानाचा आणि सर्व परिसर बॅनर व फलकांनी व्यापून गेले आहेत. त्यामुळे शिवाजी महाराज मैदानाच्या सर्व बाजूंनी हे फलक लावल्याने हवा येणेही बंद झाले असून या परिसरात फिरायला येणाऱ्या नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाल्याने यासर्व बाजूंनी परिसर व्यापून गेल्याने शिवाजी पार्ककरांचा श्वास गुदमरू लागला आहे. (Bharat Jodo Nyay Yatra)

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा (Bharat Jodo Nyay Yatra) समारोपाच्या सभेसाठी दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात त्यांच्या स्वागताच्या बॅनर व फलक लावण्यात आले आहेत. या फलकांनी मैदान परिसरातील एकही जागा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी सोडलेली नाही. शिवाजी पार्क मैदानाच्या आतील पाथवे शेजारील जाळींवरच फलक लावून संपूर्ण परिसर बंदिस्त केला आहे. याशिवाय मैदानाच्या चारही बाजूंच्या रस्त्यांवरील विजेचे खांब आणि इतर ठिकाणी बॅनर व फलक लावले असून शिवाय स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गांच्या दोन्ही बाजूंसह दुभाजक आणि रस्त्याशेजारील रेलिंग सर्व बॅनर आणि फलकांनी व्यापून गेले आहे. एकही मोकळी जागा या ठिकाणी सोडलेली नाही. (Bharat Jodo Nyay Yatra)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: लोकसभेसोबत महाराष्ट्रात विधानसभेचीही पोटनिवडणूक, केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा)

शिवाजी पार्क परिसराला एकप्रकारे बकालपणा

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकारच्या समोरील भागात काँग्रेसचे फलक व बॅनर लावण्यात आल्याने सावरकरप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी याबाबत एक्सवर विरोध दर्शवल्यानंतर या भागातील बॅनर शुक्रवारी रात्री काढण्यात आले होते; परंतु त्याही ठिकाण शनिवारी सकाळी पुन्हा बॅनर लावण्यात आले असून शिवाजी पार्क मैदानाचा परिसरात बॅनरमुळे हवा खेळती राहत नसून संपूर्ण परिसरच बंदिस्त झाल्याने लोकांना चालताना मोकळा श्वास घेणेही अवघड होऊन बसले आहे. शिवाय शिवाजी पार्क परिसराला एकप्रकारे बकालपणा प्राप्त झालेला आहे. (Bharat Jodo Nyay Yatra)

शिवाजी पार्कमधील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, आमचा जन्म या ठिकाणी झाला असून आजवर या मैदानावर अनेक लोकांच्या सभा झालेल्या आहेत; परंतु या सभेसाठी बॅनर व फलक लावताना हा भाग बकाल होणार नाही याची काळजी घेतली जात होती तसेच डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी ६ डिसेंबर व १४ एप्रिल रोजी या ठिकाणी येतात. त्यांच्याकडूनही या ठिकाणी बॅनरबाजी होते, परंतु त्या काळातही जेवढी बॅनरबाजी होत नाही त्यापेक्षा अधिक प्रमाणात ही बॅनरबाजी असून या ठिकाणी फिरायला जाणेही आता अवघड होऊन बसले आहे. मैदानाच्या परिसरात फिरताना मोकळा श्वासही घेता येत नाही, अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी काय करतात, असा सवाल येथील रहिवाशांकडून केला जात आहे. (Bharat Jodo Nyay Yatra)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.