Veer Savarkar : उद्धव ठाकरे राहुल गांधींना वीर सावरकरांसमोर नतमस्तक व्हायला लावून माफी मागायला लावणार का? ; भाजपाचे आव्हान

राहुल गांधी हे कायम सवंग प्रसिद्धीसाठी वीर सावरकर यांचा अवमान करत असतात.

126

राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रा घेऊन दादर येथे दाखल झाले आहेत. रविवार, १७ मार्च रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) राष्ट्रीय स्मारकाजवळीत छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथे जाहीर सभा होणार आहे. त्याआधीच महाराष्ट्र भाजपा प्रदेशने व्हिडीओ व्हायरल केला आहे. ज्यामध्ये उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे राहुल गांधी यांना वीर सावरकरांसमोर (Veer Savarkar) नतमस्तक व्हायला लावून माफी मागायला लावणार का, असे आव्हान दिले आहे.

राहुल गांधी हे कायम सवंग प्रसिद्धीसाठी वीर सावरकर (Veer Savarkar) यांचा अवमान करत असतात, आता तर राहुल गांधी हे चक्क स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या दारातच येऊन सभा घेणार आहेत. अशा वेळी महाराष्ट्र भाजपाने उद्धव ठाकरे यांची गोची केली आहे.

(हेही वाचा Bharat Jodo Nyay Yatra : शिवाजी पार्ककरांचा श्वास गुदमरला)

काय म्हटले आहे ‘त्या’ व्हिडिओमध्ये? 

राहुल गांधी ही त्यांची द्वेष पसरवणारी जातीयवादी यात्रा घेऊन मुंबईत येत आहे. त्यांच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे उभे राहणार आहेत. दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही असे भाषण देणारे मराठी अस्मितेचे राजकारण करणारे दिल्लीच्या युवराजापुढे नतमस्तक होतील, मराठी माणसाचे स्वाभिमान असलेले वीर सावरकर (Veer Savarkar)  यांचा अपमान ज्यांनी केला ते राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकासमोर सभा घेणार. जर खरंच आपल्या मराठी अस्मितेचे उद्धव ठाकरे यांना प्रेम असेल तर ते राहुल गांधी यांना वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यासमोर नतमस्तक व्हायला लावतील आणि माफीदेखील मागायला लावतील.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.