Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीआधी प्रशासनात मोठे फेरबदल, १२ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंगल यांची नियुक्ती सिडकोच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर करण्यात आली आहे.

182
Transfer of Chartered Officers : सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र निवडणुकीच्या तोंडावर, १३ अधिकाऱ्यांच्या बदल्या
Transfer of Chartered Officers : सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र निवडणुकीच्या तोंडावर, १३ अधिकाऱ्यांच्या बदल्या

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.शुक्रवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी १२ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंगल यांची नियुक्ती सिडकोच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर करण्यात आली आहे. (Lok Sabha Elections 2024)

ओ. पी. गुप्ता यांची अप्पर मुख्य सचिव (वित्त), संजय सेठी अप्पर मुख्य सचिव परिवहन व बंदरे, राजेश कुमार अप्पर मुख्य सचिव (महसूल), तर पराग जैन नैनोटिया यांची नियुक्ती प्रधान सचिव (माहिती तंत्रज्ञान) सामान्य प्रशासन विभाग या पदावर करण्यात आली आहे. (Lok Sabha Elections 2024)
(हेही वाचा – Farmers Protest : कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याची किंमत चुकवावी लागणार; होणार ‘ही’ कारवाई)

कोणाला कुठली जबाबदारी?

१) कविता द्विवेदी – अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे
२) डॉक्टर हेमंत वसेकर – प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प पुणे
३) कौस्तुभ दिवेगावकर – आयुक्त, पशुसंवर्धन पुणे
४) कार्तिकी एन एस – मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी पुणे
५) मिलिंद शंभरकर – मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई
६) एम जे प्रदीप चंद्र – अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय मुंबई
७) कावली मेघना – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट
८) विजय सिंगल – उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको मुंबई
९) संजय सेठी – अप्पर मुख्य सचिव, परिवहन व बंदरे
१०) पराग जैन नैनोटिया – प्रधान सचिव, (माहिती तंत्रज्ञान) सामान्य प्रशासन विभाग, मुंबई
११) ओ पी गुप्ता – अप्पर मुख्य सचिव (वित्त)
१२) राजेश कुमार – अप्पर मुख्य सचिव (महसूल)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.