Police Security: डोंबिवली स्थानकात रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त वाढला

रेल्वे स्थानक आणि रेल्वे प्रवासी सुरक्षा घेतली जात असून प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

195
Police Security: डोंबिवली स्थानकात रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त वाढला
Police Security: डोंबिवली स्थानकात रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त वाढला

कल्याण रेल्वे स्टेशनजवळ एका बेवारस बॅगेमध्ये डीटोनेटर (स्फोटके) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी डोंबिवली, ठाकुर्ली, कोपर, अप्पर कोपर, जुचंद्र या रेल्वे स्थानकात पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. रेल्वे स्थानकात संशयित व्यक्तींची बँग तपासणी सुरू असून हॅड डीक्टेटर मार्फतही तपासणी सुरू आहे. रेल्वे स्थानक आणि रेल्वे प्रवासी सुरक्षा घेतली जात असून प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे. (Police Security)

ठाणे रेल्वे पोलीस आयुक्त यांच्या आय अँड इयर संकल्पनेनुसार, डोंबिवली रेल्वे स्थानक वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांच्या देखरेखीखाली पोलीस अधिकारी व पथक तपासणी करत आहेत. या संकल्पनेनुसार रेल्वे स्थानकातील सफाई कामगार, बूट पॉलीशवाले, पेपरवाले हे रेल्वे स्थानकातील हालचालीवर लक्ष ठेवून असतात.

(हेही वाचा – Ghar Wapsi : केरळमध्ये ९२ ख्रिस्त्यांची घरवापसी; ३०० कुटुंबे शुद्धीकरणाच्या प्रतीक्षेत)

३६५ दिवस २४ तास पोलिसांचा हा तिसरा डोळा रेल्वे स्थानकात काही संशयास्पद दिसल्यास पोलिसांना याची माहिती पुरवितात. यामुळे पोलीस यंत्रणा सदर जागी तपासणी करतात. यात श्वान पथकाची मदत घेतली जात आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे पोलीस आयुक्तांनी आय अँड इयर संकल्पनुसार डोंबिवली, ठाकुर्ली, कोपर, अपर कोपर, जुचंद्र या रेल्वे स्थानकात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आल आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.