Lok Sabha Election 2024 : रायगडमधील लोकसभा उमेदवारांची वाढली डोकेदुखी ; कारण…

रायगडमध्ये अनंत गीते आणि तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे येथे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

122
Lok Sabha Election 2024 : रायगडमधील लोकसभा उमेदवारांची वाढली डोकेदुखी ; कारण...

लोकसभा २०२४ च्या निवडणुकीच्या प्रचारांची रणधुमाळी चालू असून, सर्वच उमेदवारांनी विजयासाठी जीवाचं रान करत आहेत. कडक उन्हात सुद्धा प्रचार सभा सुरू आहे. मात्र रायगड (Raigad) जिल्ह्यातील उबाठा गटाचे उमेदवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे उमेदवार यांची वेगळीच डोकेदुखी वाढली आहे. गीते आणि तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तींनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामुळे येथे या दोन्ही प्रमुख उमेदवारांपुढे मतफुटीचा धोका निर्माण झाला आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Sanjay Raut : महाराष्ट्राच्या राजकारणात शकुनी कोण?)

नेमकी माशी शिंकली कुठे ?

रायगडच्या महायुतीकडून (Mahayuti) सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) अनंत गीते (Anant Geete) हे लोकसभा (Lok Sabha Election 2024) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच यामध्ये तर महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्याच्या नावाशी साधर्म्य असलेल्या सुनील दत्ताराम तटकरे या व्यक्तीनेदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेटवची तारीख ही २२ एप्रिल आहे. त्यामुळे आगामी काळात नावात साधर्म्य असणाऱ्या व्यक्ती आपले अर्ज मागे घेणार का? असा प्रश्न समोर उभा ठाकला आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – NCP Manifesto: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे जाहीरनाम्यात?)

कोंडी करण्यासाठी विरोधकांनी केलेली चाल ? 

तर दुसरीकडे उबाठा गटाचे लोकसभा उमेदवार ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गंगाराम गीते मैदानात असताना अनंत पद्मा गीते या अपक्ष उमेदवारानेही अर्ज भरला आहे. हे कमी की काय अनंत बाळोजी गीते नावाच्या दुसऱ्या उमेदवारानेही उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे दोन दोन अनंत गीते मैदानात उतरल्याने ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांची डोकेदुखी वाढली आहे. रायगडमध्ये सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. नावात साधर्म्य असलेल्या व्यक्तींना उभे करून त्यांची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी ही चाल खेळल्याचं बोललं जात आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी अमेठीतून लढणार? )
या पूर्वीही ही झाल्या होत्या अशा घटना

“नाम में क्या लिखा है” असं जरी म्हटलं जात असलं तरी, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे उभे होते. या निवडणुकीत त्यांचा अवघ्या ०२ हजार मतांनी पराभव झाला होता. याच निवडणुकीत सुनील तटकरे नावाचा अपक्ष उमेदवार उभा होता. त्याला ०९ हजार ८४९ मते मिळाली होती. नाम साधर्म्यामुळे अपक्ष उमेदवाराकडे मते वळल्याने सुनील तटकरे यांचा पराभव झाल्याचं सांगितलं जातं. तर असाच एक प्रकार १९९१ मध्ये घडला होता. लोकसभा निवडणुकीत शेकाप उमेदवार दत्ता पाटील यांच्या विरोधात कॉँग्रेसने सेम नाच दत्ता पाटील नावाचा उमेदवार उभा केला होता. पण या नामसाधर्म्यामुळे त्याचा फटका शेकापच्या दत्ता पाटलांना बसला होता. (Lok Sabha Election 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.