Mushtaq Antulay यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश, काँग्रेससाठी मोठा धक्का

127
Mushtaq Antulay यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश, काँग्रेससाठी मोठा धक्का

महाराष्ट्रात राजकीय भूकंप महाराष्ट्रात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता काँग्रेसमधील बडे नेते महायुतीच्या गळाला लागत आहेत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे पुतणे माजी आमदार मुश्ताक अंतुले (Mushtaq Antulay) यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुश्ताक अंतुले यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशामुळे काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पक्ष प्रवेश कार्यक्रमाला प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, जेष्ठ नेते छगन भुजबळ, महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री अनिल पाटील मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. (Mushtaq Antulay)

राजकारणाला कलटणी देणारा – सुनील तटकरे

माजी आमदार मुश्ताक अंतुले (Mushtaq Antulay) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश कार्यक्रमात बोलतांना प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री दिवंगत बॅ. अंतुले यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या काम करण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या शैलीबाबत गौरवोद्गार काढले. देशातील पहिली कर्ज माफी १९६० साली बॅ. अंतूले यांच्या माध्यमातून राज्याने पाहिले आहे. (Mushtaq Antulay)

आरबीआय गव्हर्नर यांनी त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते त्यावेळेस त्यांनी कर्जमाफी निर्णयात हस्तक्षेप करू नये अन्यथा आपण राजीनामा देऊ असे परखडपणे मत मांडले होते. तसेच आमदार यांना जिल्हाधिकारी यांच्याकडून मानसन्मान देण्याबाबत शासकीय जी. आर. अंतुले यांनी काढला होता. त्यात जिल्हाधिकारी कार्यलयात आमदार आले तर जिल्हाधिकारी यांनी उभे राहावे आणि जाताना त्यांना सोडण्यासाठी जावं असा आमदारांचा सन्मान बॅ. अंतुले यांची कॉंग्रेस पक्षात ज्याप्रमाणे बॅ. अंतुले यांनी मोठं योगदान दिले मात्र पक्षाकडून का त्यांची कामाची पावती अखेरच्या दिवसांत दिसली नाही. माझ्यावर विरोधक आरोप करतात की, मी अंतुले साहेबांना फसवलं, आमच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारे जो अपप्रचार केला जात आहे त्याला उत्तर मुश्ताक अंतुले (Mushtaq Antulay) यांच्या पक्षप्रवेशाने मिळणार असल्याचेही तटकरे म्हणाले. आपण त्यांचे मनापासून स्वागत करत असल्याचेही तटकरे म्हणाले अंतुले आता अजित पवार यांच्या बरोबर फिरताय यामुळे राजकारणात कलटणी मिळेल असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केले आहे. (Mushtaq Antulay)

(हेही वाचा – Neha Hiremath: नेहा हिरेमठच्या हत्येविरोधात संतापाची लाट, निषेधकर्त्यांनी आंदोलन करून केली न्यायाची मागणी)

विकासासोबत जाण्याचा निर्णय घेतला – मुश्ताक अंतुले

प्रदेश अध्यक्ष तटकरे यांनी माझ्याबद्दल काढलेल्या गौरवोद्गाराबद्दल मुश्ताक अंतुले आपण भारावून गेलो असल्याचे अंतुले यांनी म्हटले. माझ्या आयुष्यातील महत्वाचा दिवस आहे. मंत्री छगन भुजबळ आणि मी ९२ ते ९८ विधानपरिषद सोबत होतो. बॅ. अंतुले यांच्या काळात सुरु झालेले विकास कामे श्रीवर्धन मतदार संघात सुनील तटकरे यांनी ज्याप्रकारे विकासकामे केली. मतदार संघातील राजकारणात दुसरा कोणी इंप्रेस करू शकला मात्र आपण इंप्रेस केले. आपला पिंड राजकारण नाही तर समाजकारण आहे. विकासकामे करण्याची दानत तटकरे यांच्यात आहे. मतदारसंघाचा आणि जिल्हाच्या विकास करणाऱ्या शक्तीसोबत जाण्याचा निर्णय आपण घेतला आहे. कोकणाच्या विकासकामांसाठी चांगले निर्णय या सरकारने घेतला आहे. अनेक दिवसांपासून कोकणमधील विकासकामे प्रलंबित होती ती या सरकारच्या माध्यमातून मार्गी लागणार आहे यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे मुश्ताक अंतुले (Mushtaq Antulay) म्हणाले. आपल्या सोबत काम करण्यासाठी आनंद होणार आहे. (Mushtaq Antulay)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.