Lok Sabha Election Phase 1: निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू!

120
Lok Sabha Elections : राज्यातील दोन टप्प्यातील मतदान मागच्या दोन निवडणुकांच्या तुलनेत कमी..

लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात (Lok Sabha Election Phase 1) देशातील २१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मतदारसंघांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात (Lok Sabha Election Phase 1) १६.६३ कोटी मतदार १.८७ लाख मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावू शकतील. सर्व मतदान केंद्रांवर चोख व्यवस्था करण्यात आली असून १८ लाख कर्मचारी मतदानप्रक्रियेचा कारभार सांभाळतील. (Lok Sabha Election Phase 1)

(हेही वाचा –बारामतीच्या उमेदवार Sunetra Pawar यांची संपत्ती किती? जाणून घ्या…)

राज्याचा विचार केला तर आज पूर्व विदर्भात पाच मतदारसंघात मतदान होत आहे. नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या पाच मतदारसंघात मतदान होणार आहे. (Lok Sabha Election Phase 1) गडचिरोली सोडून इतर ठिकाणी आज सकाळी ७ ते संध्याकाळी ६ दरम्यान मतदान होणार आहे. तर गडचिरोलीत सकाळी ७ ते ३ वेळेत मतदान होणार आहे. या पाचही ठिकाणी महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी थेट लढत होतेय. यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे रिंगणात आहेत. (Lok Sabha Election Phase 1)

प्रत्येक मतदान केंद्रावर मॉक पोल

सात वाजता मतदानाची प्रक्रिया सुरु होण्याआधी (Lok Sabha Election Phase 1) प्रत्येक मतदान केंद्रावर मॉक पोल केलं जात आहे. ईव्हीएम अचूक पद्धतीने काम करत आहे की नाही याची चाचणी याद्वारे घेतली जात आहे. मॉक पोलमध्ये प्रत्येक उमेदवाराला दोन वेळेला मतदान करुन तो मतदान त्याच्याच नावाने नोंदवला जात आहे की नाही हे तपासले जाते.नागपूरमध्ये २७ उमेदवार असल्याने प्रत्येक उमेदवाराला दोन याप्रमाणे मॉक पोलमध्ये ५४ मतं टाकली जात आहे. त्याची नोंद संबंधित उमेदवाराच्या समोर होत आहे की नाही हे तपासले जात आहे. (Lok Sabha Election Phase 1)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.