बारामतीच्या उमेदवार Sunetra Pawar यांची संपत्ती किती? जाणून घ्या…

213
Baramati LS Constituency : मतदान आकडेवारीचा कौल सुनेत्रा पवार यांच्या बाजूने

बारामतीच्या लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशी लढत होणार आहे. ही लढत उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध खासदार शरद पवार अशीच सुरू आहे, यामुळेच जोरदार चर्चा सुरू आहे. आज महायुतीकडून सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी सुनेत्रा पवार यांनी प्रतिज्ञापत्रातून संपत्तीविषयी माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर स्थूल मूल्य हे १२ कोटी ५६ लाख ५८ हजार ९८३ एवढे आहे.

(हेही वाचा काँग्रेसच्या निवडणूक घोटाळ्याचे पहिले बळी ठरले होते Dr. Babasaheb Ambedkar)

किती आहे स्थावर मालमत्ता? 

सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हातातील रोख रक्कम ३ लाख ३६ हजार ४५० रुपये एवढी आहे. बँकेत त्यांच्या नावे २ कोटी ९७ लाख ७६ हजार रुपये आहे. तर पती अजित पवार यांची बँकेतील ठेवी २ कोटी २७ लाख ६४ हजार ४५७ रुपये एवढी आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावावर बँकेत कर्जही आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर १२ कोटी ११ लाख १२ हजार ३७४ रुपयांचे कर्ज आहे. अजित पवार यांच्या नावावरही कर्ज ४ कोटी ७४ लाख ३१ हजार २३९ रुपयांचे कर्ज आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडे ३४ लाख ३९ हजार ५६९ रुपये इतक्या रुपयांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिणे आहेत. यामध्ये चांदीच्या ताटांचा समावेश आहे. तसेच १० लाख ७० हजारांच्या किमतीच्या गाड्या आहेत. यामध्ये एक ट्रॅक्टर आणि दोन ट्रेलर आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे ५८ कोटी ३९ लाख ४० हजार ७५१ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यात शेतजमीन आणि बिगरशेतीच्या जमिनीचा समावेश आहे. सुनेत्रा पवारांच्या नावे १२ कोटी ५६ लाख ५८ हजार ९८३ रुपयांची जंगम मालमत्ता असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे १३ कोटी २५ लाख ६ हजार ०३३ रुपये एवढी आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.