Lok Sabha Election : हेमा मालिनीच्या मथुरेत कंगना रणौतचा शिरकाव

भारतीय जनता पक्ष लोकसभेच्या निवडणुकीत मथुरेतून कोणाला मैदानात उतरविणार? याची चर्चा आतापासून सुरू झाली आहे. याचे कारण एकच की, चित्रपट अभिनेत्री कंगणा राणावत यांनी लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

89
Lok Sabha Election : हेमा मालिनीच्या मथुरेत कंगणा राणावतचा शिरकाव
Lok Sabha Election : हेमा मालिनीच्या मथुरेत कंगणा राणावतचा शिरकाव

चित्रपट अभिनेत्री कंगना रणौत यांनी श्रीकृष्णाच्या मंदिरात निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करून उकळत्या तेलाच्या कढईत पाणी शिंपडण्याचे काम केले आहे. कंगना यांनी कोणत्याही मतदारसंघाचे नाव घेतले नाही. परंतु हेमा मालिनी यांच्या मथुरेवर त्यांची दृष्टी पडली आहे, एवढे नक्की! (Lok Sabha Election)

लीला पुरूषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांच्या मथुरेत लवकरच महाभारत बघायला मिळणार आहे. भारतीय जनता पक्ष लोकसभेच्या निवडणुकीत मथुरेतून कोणाला मैदानात उतरविणार? याची चर्चा आतापासून सुरू झाली आहे. याचे कारण एकच की, चित्रपट अभिनेत्री कंगना रणौत यांनी लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Lok Sabha Election)

अलिकडेच कंगना रणौत यांनी गुजरातमधील द्वारकाधीश मंदिराला भेट दिली होती. यावेळी त्यांना लोकसभेची निवडणूक लढविणार काय? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या की, ‘भगवान श्रीकृष्णाने आशीर्वाद दिला तर मी नक्कीच निवडणूक लढेन’. कंगनाने मथुराचे नाव घेतले नसले तरी त्यांचा इशारा मथुरा या हेमा मालिनी यांच्या लोकसभा मतदारसंघाकडेच होता, हे येथे उल्लेखनीय. (Lok Sabha Election)

महत्वाचे म्हणजे, कंगना रणौत यांनी मागील दोन वर्षांत तीन-चार वेळा मथुरेला भेट दिली आहे. येथील ब्रज मंदिरांना भेटी दिल्या. एवढेच नव्हे तर, कान्हासोबत आपले अतूट नाते आहे असा दावा सुध्दा त्यांनी केला. ब्रजला वारंवार भेटी देणे आणि विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार करण्याच्या विचाराने त्यांना मथुरेतून लोकसभा निवडणूक लढविण्याची प्रेरणा मिळाली आहे. (Lok Sabha Election)

दरम्यान, या मुद्यावर बोलताना मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांनी थेट विधान केले नाही. परंतु, मथुरेतून लढण्यासाठी केवळ चित्रपट कलावंतांचीच गरज नाही तर स्थानिक नेते सुध्दा आहेत, असे त्या म्हणाल्या. अनेक नेते लढण्यास उत्सुक आहेत ही चांगली बाब आहे. यावर पक्षाकडून अंतिम निर्णय घेतला जाईल. (Lok Sabha Election)

(हेही वाचा – ICC World Cup : पाक संघ उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता किती?)

याशिवाय, महाभारत मालिकेत भगवान श्रीकृष्णाची भूमिका करणारे माजी खासदार नितीश भारद्वाज यांच्या नावाची सुध्दा चर्चा सुरू ओह. ते मथुरेतून लोकसभा निवडणूक लढवू शकतात असे म्हटले जात आहे. महाभारतामुळे त्यांची श्रीकृष्णाची निर्माण झालेली प्रतिमा निवडणुकीत फायद्याची ठरू शकते, असे अनेकांना वाटत आहे. (Lok Sabha Election)

हेमामालिनी मागील दोन टर्मपासून मथुरेच्या खासदार आहेत. २०१४ आणि २०१९ मध्ये त्या येथून निवडून आल्या आहेत. यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्यामागे असलेले बॉलिवूडचे वलय. दुसरे म्हणजे त्या जाट उमेदवार होत्या. मात्र, परिस्थिती आता बदलत चालली आहे. भाजपच्या धोरणानुसार हेमा मालिनी यांनी वयाची ७५ वर्षे ओलांडली आहेत. ७५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना तिकीट द्यायचे नाही असा भाजपने निर्णय घेतला आहे. मात्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या निवडणुकीत भाजपने काही वयोवृद्धांना उतरवून वयोमर्यादेची अट काढून टाकण्याचे संकेत दिले आहेत. (Lok Sabha Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.