Virat Kohli 49th Ton : विराटच्या ४९व्या शतकानंतर पत्नी अनुष्काचा भावपूर्ण संदेश

विराट कोहलीचं विक्रमी ४९वं शतक पाहण्यासाठी पत्नी अनुष्का शर्मा मैदानावर हजर नव्हती. पण, सामना संपल्यानंतर तिने ट्विटरवर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

50
Virat Kohli 49th Ton : विराटच्या ४९व्या शतकानंतर पत्नी अनुष्काचा भावपूर्ण संदेश
Virat Kohli 49th Ton : विराटच्या ४९व्या शतकानंतर पत्नी अनुष्काचा भावपूर्ण संदेश
  • ऋजुता लुकतुके

विराट कोहलीचं विक्रमी ४९वं शतक पाहण्यासाठी पत्नी अनुष्का शर्मा मैदानावर हजर नव्हती. पण, सामना संपल्यानंतर तिने ट्विटरवर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. (Virat Kohli 49th Ton)

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांसमोर खेळताना आपली खास खेळी पेश केली आणि त्यासाठी त्याला मिळालेलं बक्षीसही खास होतं. कारण, हे त्याचं विक्रमी शतक होतं. सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करणारं हे शतक होतं. (Virat Kohli 49th Ton)

त्यात त्याचं हे शतक ३५व्या वाढदिवशी साजरं झालं. शतकानंतर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने सगळ्यात आधी ट्विटरवर एक छान संदेश लिहून विराटचं कौतुक केलं. पाठोपाठ विराटची पत्नी अनुष्कानेही आपलं मन मोकळं करणारा एक संदेश पतीसाठी लिहिला. (Virat Kohli 49th Ton)

New Project 43 1

‘आपल्या वाढ दिवशी स्वत:लाच एक सुरेख भेट देणारा विराट!’ असं म्हणत तिने विराटचा हवेत बॅट उंचावणारा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. या स्टोरी बरोबरच अनुष्काने ट्विटरवरही एक संदेश लिहिला आहे. यात तिने विराटच्या पहिल्या टी-२० सामन्यातील विकेटबद्दल लिहिलं आहे. (Virat Kohli 49th Ton)

‘प्रत्येकच भूमिकेत तू असामान्य आहेस. तरीही प्रत्येक वेळी काही तरी आणखी अद्भूत करत राहतोस. म्हणूनच तू मला खूप आवडतोस,’ असा एक संदेशही अनुष्काने लिहिला आहे. विराटच्या पहिल्या टी-२० सामन्यात गोलंदाजी करताना त्याने वाईड चेंडू टाकला होता. तरीही धोनीने फलंदाज यष्टीचीत केल्यामुळे विराटला बळी मिळाला. म्हणजेच, आपल्या शून्याव्या चेंडूवर विराटला बळी मिळाला आणि अशी असामान्य कामगिरी करणारा तो क्रिकेटपटू आहे, असं अनुष्काला म्हणायचं होतं. (Virat Kohli 49th Ton)

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

(हेही वाचा – Lok Sabha Election : हेमा मालिनीच्या मथुरेत कंगणा राणावतचा शिरकाव)

विराट सहाव्या षटकात फलंदाजीसाठी आला. तेव्हापासून पुढचा अख्खा भारतीय डाव विराट खेळला. ईडन गार्डन्सच्या फलंदाजाचा कस पाहणाऱ्या खेळपट्टीवर विराटने एक बाजू लावून धरल्यामुळेच भारताला ३२५ धावांचा पल्ला गाठता आला. तो ३७ धावांवर असताना महाराजच्या गोलंदाजीवर आफ्रिकन फलंदाजांनी झेलसाठी अपील केलं होतं. पण, तिसऱ्या पंचांनी विराट बाद नसल्याचा कौल दिला. हा एक प्रसंग सोडला तर विराटची खेळी निर्दोष होती. (Virat Kohli 49th Ton)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.