Lok Sabha Election : बसपामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ

काँग्रेसकडून अद्याप अमेठी आणि रायबरेलीतून उमेदवार कोण असणार, याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे.

103
Lok Sabha Election : बसपामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ

उत्तर प्रदेशात काँग्रेसला (Congress) मागील निवडणुकीत रायबरेली ही एकमेव जागा मिळाली होती. आता ही एकमेव जागादेखील गमावण्याची भीती काँग्रेसला वाटू लागली आहे. कारण बहुजन समाजवादी पक्षाने रायबरेलीमधून उमेदवार उभा करण्याचे निश्चित केले आहे. यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण भाजपाने कंबर कसली असून, त्यांना मायावतींचीही साथ मिळणार आहे. मात्र काँग्रेसकडून अद्याप अमेठी आणि रायबरेलीतून उमेदवार कोण असणार, याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. राहुल गांधींना आधीच केरळमधील वायनाडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर रायबरेलीतून प्रियांका गांधींच्या नावाची चर्चा आहे. सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्याने काँग्रेसकडून प्रियांका यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. (Lok Sabha Election)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: वसंत मोरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर म्हणाले…)

काँग्रेससमोर मायावतींचे आव्हान

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी लोकसभा निवडणुकीत ‘एकला चलो’ची भूमिका घेतली आहे. मागील निवडणुकीतही त्यांनी समाजवादी पक्षासोबत आघाडी केली होती. आता कोणत्याही पक्षासोबत न जाण्याचा निर्णय घेत त्यांनी काँग्रेससमोरही (Congress) आव्हान उभे केले आहे. मागील निवडणुकीत त्यांनी रायबरेली आणि अमेठी या हायप्रोफाइल मतदारसंघात उमेदवार दिले नव्हते. यावेळी मात्र, त्यांनी थेट आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. (Lok Sabha Election)

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रायबरेली मतदारसंघातून सोनिया गांधी विजयी झाल्या होत्या, तर अमेठी मतदारसंघात स्मृती इराणींनी राहुल गांधींनी पराभूत करत काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला काबीज केला. त्यावेळी बसपा किंवा सपाने या मतदारसंघात उमेदवार दिले नव्हते. या निवडणुकीत सपा आणि बसपाची आघाडी झाली होती. पण त्यानंतरही भाजपाला ८० पैकी ६४ जागांवर विजय मिळाला, तर आघाडीला केवळ ५ जागा मिळाल्या होत्या. दोन्ही मतदारसंघांत बसपाचे उमेदवार निवडणूक लढणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ पाल यांनी दिली. (Lok Sabha Election)

काँग्रेसचे टेंशन वाढले

बसपाच्या या घोषणेमुळे काँग्रेसचे (Congress) टेंशन काही प्रमाणात वाढले आहे. मात्र, तरीही समाजवादी पक्ष सोबत असल्याने त्याचा फारसा परिणाम होणार नाही, अशी आशा काँग्रेसला आहे. सपाने काँग्रेसला १७ जागा सोडल्या आहेत. सपाची मदत दोन्ही मतदारसंघात थेट होणार असल्याने या निवडणुकीत अमेठी आणि रायबरेलीसह आणखी काही जागा पदरात पडतील, असा दावा नेत्यांकडून केला जात आहे. (Lok Sabha Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.