Major Sandeep Unnikrishnan : मुंबईवरील हल्ल्यात अतुलनीय शौर्य गाजवलेले हुतात्मा मेजर संदीप उन्नीकृष्णन

176
Major Sandeep Unnikrishnan : मुंबईवरील हल्ल्यात अतुलनीय शौर्य गाजवलेले हुतात्मा मेजर संदीप उन्नीकृष्णन
Major Sandeep Unnikrishnan : मुंबईवरील हल्ल्यात अतुलनीय शौर्य गाजवलेले हुतात्मा मेजर संदीप उन्नीकृष्णन

आज भारत सुरक्षित आहे, तो अनेक वीर हुतात्म्यांच्या बळावर. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही अनेक वीरांनी भारतमातेसाठी मरणाला कवटाळले म्हणून आज आपण मोकळा श्वास घेत आहोत. त्यापैकी एक महान योद्धा म्हणजे संदीप उन्नीकृष्णन… (Major Sandeep Unnikrishnan)

उन्नीकृष्णन हे भारतीय सैन्यात मेजर होते. त्यांनी नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स (National Security Guards, एनएसजी) च्या स्पेशल टास्क ग्रुपमध्ये काम केले होते. नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबई हल्ल्यात (26/11 attack) दहशतवाद्यांशी लढताना ते हुतात्मा झाले. त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना २६ जानेवारी २००९ रोजी अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.

(हेही वाचा – Sharad Pawar यांच्या भेटीगाठी वाढल्या; निलेश लंके, वसंत मोरेंनंतर जानकरांसोबत चर्चा)

ताज हॉटेलमध्ये सशस्त्र दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण

हुतात्मा संदीप उन्नीकृष्णन यांचा जन्म १५ मार्च १९७७ रोजी बंगळुरु येथे एका नायर कुटुंबात झाला. त्यांचे वडील के उन्नीकृष्णन हे आयएसआयओ अधिकारी होते. आपल्या शौर्याने त्यांनी देशवासियांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. जेव्हा जेव्हा त्यांचे नाव घेतले जाते, तेव्हा तेव्हा देशवासियांच्या डोळ्यांत अश्रू तरळतात आणि त्यांची छाती अभिमानाने फुगते. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये सशस्त्र दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आले. ’वर येऊ नका, मी बघून घेईन त्यांना’ हे त्यांचे शेवटचे शब्द होते.

सहकार्‍याला वाचवताना दिले बलीदान

ऑपरेशनच्या वेळी एक कमांडो जखमी झाला होता, तेव्हा मेजर उन्नीकृष्णन यांनी त्याला बाहेर काढण्याची व्यवस्था केली आणि स्वतः दहशतवाद्यांशी सामना करू लागले. दहशतवादी हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर पळून गेले आणि त्यांचा सामना करताना मेजर उन्नीकृष्णन गंभीर जखमी झाले. आपल्या सहकार्‍याला वाचवताना मेजर उन्नीकृष्णन यांनी बलीदान दिले. आज त्यांची जयंती. भारतमातेच्या या वीर सुपुत्राला वंदन. (Major Sandeep Unnikrishnan)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.