Lok Sabha Election 2024 : उत्तराखंडमध्ये भाजपा हॅटट्रिक साधणार की कॉंग्रेस मुसंडी मारणार?

१८ व्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष उत्तराखंडमधील पाचही जागा जिंकून सलग तिसऱ्यांदा विजयाची हॅटट्रिक करण्याच्या मूडमध्ये आहे.

88
Lok Sabha Election 2024 : दिल्लीत ५ वर्षांत ३० टक्क्यांनी बेघर मतदार वाढले
  • वंदना बर्वे

आकाशाला स्पर्श करणारे डोंगर तसेच मनाला मोहून टाकणारा अलखनंदा आणि भगीरथीचा संगम असलेल्या उत्तरांखडची जनता आपल्या प्रतिनिधींची निवड करण्यासाठी सज्ज आहे. उत्तराखंडमधील पाचही जागावर पहिल्याच टप्प्यात अर्थात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. टिहरी गढवाल, गढवाल, अल्मोरा, नैनिताल-उधम सिंग नगर आणि हरिद्वार अशा लोकसभेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. (Lok Sabha Election 2024)

१८व्या लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Election) भारतीय जनता पक्ष उत्तराखंडमधील पाचही जागा जिंकून सलग तिसऱ्यांदा विजयाची हॅटट्रिक करण्याच्या मूडमध्ये आहे. २४ वर्षांपूर्वी जन्माला आलेला उत्तरांखड राज्य समान नागरी संहिता (UCC) कायदा संमत करणारे पहिले राज्य होय. याचा किती फायदा भाजपाला मिळतो हे निकालातूनच स्पष्ट होईल. परंतु, शेतकरी आणि सैनिकांच्या नाराजीचा सामना भाजपाला करावा लागत आहे, हेही तेवढेच खरे आहे. (Lok Sabha Election 2024)

चार धाम यात्रा

चार धाम यात्रेसाठी (बद्रीनाथ-केदारनाथ-गंगोत्री-यमुनोत्री मंदिरे) प्रसिद्ध उत्तराखंडच्या जनतेने २०१४ आणि २०१९च्या निवडणुकीत भाजपाच्या (BJP) झोळीत सर्व जागा टाकल्या होत्या. याशिवाय, २०१७ आणि २०२२ मधील विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपाच्या हाती राज्याची सत्ता सोपविली होती. उमेदवारांमध्ये अनुभवी राजकारणी, नवे नेते आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा समोवश आहे. अल्मोडामध्ये भाजपाकडून अजय टमटा आणि काँग्रेसकडून प्रदीप टमटा हे उमेदवार रिंगणात आहेत. तसेच गढवालमध्ये काँग्रेसचे गणेश गोदियाल हे भाजपाचे अनिल बलुनी यांच्या विरोधात लढत आहेत. हरिद्वारमध्ये पक्षांनी बसपाकडून जमील अहमद, भाजपाकडून त्रिवेंद्र सिंह रावत आणि काँग्रेसकडून वीरेंद्र रावत यांसारखे उमेदवार उभे केले आहेत. नैनिताल-उधम सिंग नगरमध्ये दावेदारांमध्ये भाजपाचे अजय भट्ट, काँग्रेसचे प्रकाश जोशी यांचा समावेश आहे. बसपाकडून अख्तर अली माहीगीर. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Supreme Court : ईव्हीएममधील मतमोजणीविषयी याचिका; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला ‘हा’ आदेश)

नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध

नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या टिहरी गढवालमध्ये बसपचे उमेदवार नीमचंद चुरियाल, भाजपाकडून माला राज्य लक्ष्मी शहा आणि काँग्रेसकडून जोतसिंग गुंटसोला मैदानात आहेत. उत्तराखंडमधील दिग्गज नेत्यांची कर्मभूमी असलेल्या गढवाल लोकसभा मतदारसंघात उमेदवारासह हायकमांडची सुध्दा प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बद्रीनाथ आणि केदारनाथ, शीखांचे पवित्र तिर्थस्थह हेमकुंड साहिब ते रामनगर आणि कोटद्वार भाबरपर्यंत पसरलेल्या या मतदारसंघातील निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. (Lok Sabha Election 2024)

भाजपाने गढवालमधून राष्ट्रीय मीडिया प्रमुख अनिल बलुनी यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने माजी प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल यांना उमेदवारी दिली आहे. मुख्य स्पर्धा उमेदवारांमध्येच असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रतिष्ठा सुध्दा पणाला लागली आहे. कारण, बलुनी मोदी आणि शहा यांच्या जवळचे मानले जातात. गढवालमधून आतापर्यंत अनेक दिग्गज नेते निवडून गेले आहेत. अविभाजित उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा, भुवनचंद्र खंडुरी, माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि सध्या राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज, माजी मुख्यमंत्री आणि खासदार तीरथ सिंह रावत, राज्याचे माजी मंत्री टीपीएस रावत, जगन्नाथ शर्मा, प्रताप सिंह नेगी, चंद्रमोहन सिंह नेगी अशा मोठमोठ्या नेत्यांनी गढवालचे प्रतिनिधीत्व केले आहे. (Lok Sabha Election 2024)

१९८२मध्ये गढवालच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. काँग्रेसशी संबंध तोडून हेमवती नंदन बहुगुणा यांनी येथून निवडणूक लढवली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बहुगुणा यांचा पराभव करण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. परंतु, बहुगुणा विजयी झाले. आता गढवालसह पाचही मतदारसंघातून जनता कुणाला लोकसभेत पाठविते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.