Supreme Court : ईव्हीएममधील मतमोजणीविषयी याचिका; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला ‘हा’ आदेश

Supreme Court : याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी केरळमधील घटनेचा उल्लेख केला. त्याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने 18 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

188
Supreme Court : ईव्हीएममधील मतमोजणीविषयी याचिका; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला 'हा' आदेश
Supreme Court : ईव्हीएममधील मतमोजणीविषयी याचिका; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला 'हा' आदेश

भाजपाने यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्त्वात ‘अब की बार 400 पार’ असा नारा दिला आहे. भाजपाच्या या घोषणेवरून विरोधकांकडून ईव्हीएमच्या घोळावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ईव्हीएम (EVM) मशीनमध्ये घोटाळा करूनच भाजपा 400 पार जाणार असल्याचे विरोधकांकडून जाहीरपणे बोलले जात आहे. या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) ईव्हीएमसंदर्भातील याचिकेवर न्यायालयाने 18 एप्रिल रोजी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

(हेही वाचा – Uday Samant:नारायण राणेंचा प्रचार करू, उदय सामंतांनी केली भुमिका स्पष्ट)

प्रशांत भूषण यांच्याकडून केरळचा उल्लेख

केरळमध्ये (Kerala) कासरगोड लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला 1 अधिक मतदान झाल्याच्या प्रकरणावर उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने निवडणूक आयोगाला (Election Commission) दिले. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्या सध्या व्हीव्हीपॅटमधील मतदानाची 100 टक्के मोजणी केली जावी, या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्या दरम्यान याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी केरळमधील घटनेचा उल्लेख केला. त्याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने 18 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

4 इव्हीएम मशीनमध्ये भाजपला मत गेल्याचा दावा

याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तीवाद करताना ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केरळमधील स्थानिक वृत्तपत्राच्या बातमीची दखल देत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इव्हीएम मशीनच्या डेमो दरम्यान 4 इव्हीएम मशीनमध्ये भाजपला मत गेल्याचा दावा एलडीएफ आणि युडीएफच्या उमेदवाराने केला आहे. तसेच रिटर्नींग ऑफिसरकडे या संदर्भात तक्रारदेखील केल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

यानंतर या प्रकरणाची सुनावणी करत असलेल्या न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दिपांकर दत्ता यांच्या खंडपिठाने नक्की काय घडले आहे, याची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. केरळमध्ये कासरगोड लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला 1 अधिक मतदान झाल्याच्या प्रकरणावर उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने (Supreme Court) दिले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.