IPL 2024, RCB Campaign Derailed : बंगळुरू संघाने ११ फलंदाज घेऊन खेळावं, असं ‘या’ माजी क्रिकेटपटूने का सुचवलं?

IPL 2024, RCB Campaign Derailed : विराट कोहली आणि फाफ दू प्लेसिस चांगले फॉर्ममध्ये असताना बंगळुरूचा संघ चांगली कामगिरी करू शकलेला नाही

88
IPL 2024, RCB Campaign Derailed : बंगळुरू संघाने ११ फलंदाज घेऊन खेळावं, असं ‘या’ माजी क्रिकेटपटूने का सुचवलं?
IPL 2024, RCB Campaign Derailed : बंगळुरू संघाने ११ फलंदाज घेऊन खेळावं, असं ‘या’ माजी क्रिकेटपटूने का सुचवलं?
  • ऋजुता लुकतुके

माजी क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकांत (Krishnamachari Srikanth) यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचं यंदाच्या आयपीएलमधील अपयश जिव्हारी लागलं आहे. खासकरून सनरायझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाने शेवटच्या साखळी सामन्यात बंगळुरू विरुद्ध ३ बाद २८७ धावांची धावसंख्या उभारली त्यामुळे श्रीकांत नाराज आहेत. संघाची कामगिरीही अशी आहे की, ७ सामन्यांतील ६ संघाने गमावले आहेत. घरचं चिन्नास्वामी मैदान छोटं आहे. त्यामुळे निदान या मैदानावर खेळताना संघाने ११ फलंदाजी खेळवावेत. विराट कोहलीने आता गोलंदाजीही सुरू करावी, असं श्रीकांत यांनी उपहासाने सुचवलं आहे. ‘विराट संघातील नियमित गोलंदाजांपेक्षा चांगले चेंडू टाकेल,’ असं त्यांना वाटतं.  (IPL 2024, RCB Campaign Derailed)

(हेही वाचा- Ramdas Athawale:“कुणी कितीही केला कल्ला, तरी सुनेत्रा पवारच जिंकणार बारामतीचा किल्ला”,रामदास आठवलेंचा विरोधकांवर निशाणा)

‘रिसी टॉपलीला मार पडला, लॉकी फर्ग्युसनला (Lockie Ferguson) मार पडला. आता करायचं काय? दू प्लेसिसने दोन षटकं टाकावीत, कॅमेरुन ग्रीनचा ४ षटकांसाठी विचार व्हावा. विराट कोहलीही नियमित गोलंदाजांपेक्षा जास्त चांगली गोलंदाजी करू शकतो. यातून आणखी एक शक्यता निर्माण होईल. संघ ११ फलंदाजी खेळवू शकतील. त्याचीही संघाला गरज आहे,’ या शब्दात श्रीकांत यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर टीका केली. (IPL 2024, RCB Campaign Derailed)

बंगळुरू संघाने या सामन्यात मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) विश्रांती दिली. तर एकही फिरकीपटू खेळवला नाही. फिरकीसाठी संघ विल जॅक्सवर अवलंबून होता. पण, त्यानेही ३ षटकांत ३२ धावा दिल्या. रिस टॉपली, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन आणि व्यक्ष यांनी तर १० षटकांत १३७ धावा दिल्या. त्यामुळे सनरायझर्स हैद्राबादला २० षटकांत २८७ धावा करणं शक्य झालं. (IPL 2024, RCB Campaign Derailed)

(हेही वाचा- Uday Samant:नारायण राणेंचा प्रचार करू, उदय सामंतांनी केली भुमिका स्पष्ट)

सामन्यात सनरायझर्स हैद्राबादच्या (Sunrisers Hyderabad) फलंदाजांनी २२ षटकार ठोकले. तर बंगळुरूच्या संघानेही १६ षटकार ठोकले. पण, प्रयत्न करूनही बंगळुरूला विजयासाठी २० धावा कमीच पडल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंगळुरू संघाला सहाव्या सामन्यात हार पत्करावी लागली. (IPL 2024, RCB Campaign Derailed)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.