Ramdas Athawale:“कुणी कितीही केला कल्ला, तरी सुनेत्रा पवारच जिंकणार बारामतीचा किल्ला”,रामदास आठवलेंचा विरोधकांवर निशाणा

119
Ramdas Athawale:“कुणी कितीही केला कल्ला, तरी सुनेत्रा पवारच जिंकणार बारामतीचा किल्ला”,रामदास आठवलेंचा विरोधकांवर निशाणा
Ramdas Athawale:“कुणी कितीही केला कल्ला, तरी सुनेत्रा पवारच जिंकणार बारामतीचा किल्ला”,रामदास आठवलेंचा विरोधकांवर निशाणा

पुण्यात महायुतीच्या सभेसाठी रामदास आठवलेही (Ramdas Athawale) व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारार्थ केलेल्या भाषणातून शरद पवार (Sharad Pawar) व सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) आपल्या खास शैलीत टोलेबाजी केली. तसेच, खास त्यांच्या शैलीतल्या कविता त्यांनी ऐकवताच उपस्थितांममध्ये चांगलाच हशा पिकला. भाषणाची सुरुवातच कवितांनी केली. (Ramdas Athawale) “एवढंच सांगतो की ‘अजित पवार महायुतीसोबत आले ज्या कारणामुळे, ते कारण आहेत सुप्रिया सुळे, अजित पवार आता राहिले नाहीत खुळे, त्यामुळेच हरणार आहेत सुप्रिया सुळे… कुणी कितीही केला कल्ला, तरी सुनेत्रा पवारच (Sunetra Pawar) जिंकणार आहेत बारामतीचा किल्ला.. अजित पवारांनी गाठलाय विकासाचा पल्ला.. म्हणूनच मी शरद पवारांना देतो मोदींसोबत येण्याचा सल्ला” असं त्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. (Ramdas Athawale)

शरद पवार यांनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना बाहेरची सून असे म्हटले होते. यावर‘बाहेरची सून’ म्हणून टीका करणाऱ्या विरोधकांना रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) कवितेच्या माध्यमातून खोचक उत्तर दिलं. “सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडे आहेत फारच चांगले गुण, तरी तुम्ही म्हणताय ही बाहेरची आहे सून, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) निवडून येण्याचा महिना आहे जून आणि अजित पवार फेडतील बारामतीकरांचे ऋण” असं रामदास आठवले म्हणाले. (Ramdas Athawale)

आता सुनेत्रा पवारांना चांगली भाषणं करू द्या

“सुप्रिया सुळेंबद्दल मला आनंद आहे. त्यांनी लोकसभेत चांगली भाषणं केली आहेत. आता सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) चांगली भाषणं करू द्या. त्यांना संसदेत जाऊ द्या. अजित पवारांनी सर्वात आधी निर्णय घेतला की सुनेत्रा पवारांना उभं करायचं. तेव्हा शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना उभं करायला नको होतं. ही सून बाहेरची कशी झाली? सुप्रिया सुळेच बाहेरच्या आहेत. त्यांचं लग्न झाल्यानंतर त्या सुळे कुटुंबात गेल्या आहेत. सुनेत्रा पवार या पवार कुटुंबात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना बाहेरचं म्हणणं योग्य नाही. त्या आपल्या सून आहेत” असं रामदास आठवले म्हणाले. (Ramdas Athawale)

शरद पवार इकडे आले असते तर

“जेव्हा सोनिया गांधी (Sonia Gandhi) बाहेरच्या होत्या, तेव्हा शरद पवारांनी त्या बाहेरच्या आहेत म्हणून त्यांच्यावर आरोप केले होते. शरद पवारांना काँग्रेसनं पक्षातून काढून टाकलं. ज्या काँग्रेसनं त्यांच्यावर अन्याय केला, त्या काँग्रेससोबत जायची गरज नव्हती. पण त्यांनी निर्णय घेतला नाही. शरद पवार इकडे आले असते तर अजित पवार इकडे आलेच असते. पक्षात फूट पडलीच नसती. शेवटी अजित पवारांना निर्णय घ्यावा लागला. शरद पवारांचं घड्याळ गेलं. गावागावातली म्हणत आहेत म्हातारी, शरद पवार का घड्याळ सोडून वाजवत आहेत तुतारी?” अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे. (Ramdas Athawale)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.