Lok Sabha Election 2024: वर्षा बंगल्यावर बैठकांचा सपाटा; हिंगोली, यवतमाळ, वाशिम आणि नाशिकचा उमेदवार ठरणार ?

143
Lok Sabha Election 2024: वर्षा बंगल्यावर बैठकांचा सपाटा; हिंगोली, यवतमाळ, वाशिम आणि नाशिकचा उमेदवार ठरणार ?
Lok Sabha Election 2024: वर्षा बंगल्यावर बैठकांचा सपाटा; हिंगोली, यवतमाळ, वाशिम आणि नाशिकचा उमेदवार ठरणार ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या ‘वर्षा’या शासकीय निवासस्थानी सध्या बैठकांचा सपाटा सुरू आहे. (Lok Sabha Election 2024) मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या 3 खासदारांची उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही. त्यामुळे या तीनही खासदारांची धाकधूक वाढली आहे. हे तीनही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर गेल्या काही तासांपासून तळ ठोकून बसलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली, यवतमाळ, वाशिम आणि नाशिक या जागांसाठी वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडत आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- Narendra Modi: राज्यात मोदी-शाह फुंकणार प्रचाराचे रणशिंग; रामटेकमध्ये मोदींची पहिली सभा)

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी आपल्या उमेदवारीसाठी वर्षा बंगल्यावर आले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे आमदार सुहास कांदे, भाऊ चौधरी यांच्यासह नाशिकचे 20 पदाधिकारी वर्षा बंगल्यावर दाखल आहेत. शिवसेनेचे मंत्री दादा भुसे त्यांचा यवतमाळचा दौरा रद्द करून मुंबईच्या दिशेला निघाले आहेत. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा भाजपाचाच मतदारसंघ – नारायण राणे)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर सातत्याने बैठकांचे सत्र सुरू आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत जवळपास साडेतीन तास या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित असल्याने ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाविषयी चर्चा झाल्याचे समजते. (Lok Sabha Election 2024)

हे पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.