Kangana Ranaut : त्यांना लोकशाहीची व्याख्या माहीत नाही; राहुल गांधींच्या टीकेला अभिनेत्री कंगणा रणौतचे प्रत्युत्तर

118
Kangana Ranaut : त्यांना लोकशाहीची व्याख्या माहीत नाही; राहुल गांधींच्या टीकेला अभिनेत्री कंगणा रणौतचे प्रत्युत्तर
Kangana Ranaut : त्यांना लोकशाहीची व्याख्या माहीत नाही; राहुल गांधींच्या टीकेला अभिनेत्री कंगणा रणौतचे प्रत्युत्तर

देशात लोकसभा (Lok Sabha 2024) निवडणुकीच्या प्रचारांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यातच दिल्लीचे (Delhi)मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal)यांना अटक झाल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. देशाच्या लोकशाहीची हत्या झाल्याचा आरोप राहुल गांधी (Rahul Gandhi) वारंवार करत आहेत. राहुल गांधी यांना लोकशाहीची व्याख्या माहीत नाही असे म्हणत राहुल गांधी यांच्यावर कंगणाने पलटवार केला. (Kangana Ranaut)

(हेही वाचा – Dinesh Sharma : ही निवडणूक सावरकरांना आदर्श मानणारे आणि त्यांचा अपमान करणारे यांच्यातील आहे; दिनेश शर्मा यांचे परखड प्रतिपादन)

लोकशाहीची हत्या होत आहे, तर आपण कशाची तयारी करतोय?

हिमाचल प्रदेशात मंडी (Himachal Pradesh Mandi) येथून भाजपाने अभिनेत्री कंगणा रणौत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, प्रचाराच्या वेळी भाषणात कंगणा रणौतने राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. देशात लोकशाहीची हत्या झाली आहे, असे राहुल गांधी सातत्याने म्हणत आहेत. यावर तुमचं मत काय असा प्रश्न पत्रकारांनी कंगना रणौतला विचारला. त्यावर कंगना रणौत म्हणाली, जर लोकशाहीची हत्या होत आहे, तर आपण कशाची तयारी करतोय? लोकांचं मन जिंकणं, लोकांकडून त्यांच्या सहकार्याची अपेक्षा करणे, लोकांना आपण सहकार्य करणे, त्यांचं तुमच्यावर विश्वास असणं, प्रेम असणं, त्यांच्याबरोबर संबंध असणं ही लोकशाहीची हत्या आहे का? हीच लोकशाही आहे. कदाचित त्यांना लोकशाहीची व्याख्या माहीत नाही. (Kangana Ranaut)

(हेही वाचा – मनोज जरांगेंकडे Maratha समाजाची पाठ

‘अबकी बार ४०० पार’ करण्य़ाचं भाजपाचे लक्ष

तसेच अभिनय क्षेत्रात उत्तम छाप पाडणारी अभिनेत्री कंगणा रणौत (Actor Kangana Ranaut) पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. रोड शो आणि रॅलीने आपल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी सुरूवात केली आहे. भाजपा हिमाचल प्रदेशातील लोकसभा २०२४ (Lok Sabha 2024) निवडणुकाच्या चारही जागा जिंकणार, असा विश्वास व्यक्त करत, निवडणुकीत ‘अबकी बार ४०० पार’ करण्य़ाचं भाजपाचे लक्ष आहे, असे कंगणा ने प्रचाराच्यावेळी भाषणात म्हटले. राहुल गांधींना प्रत्युत्तर दिल्याचा कंगणाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून सर्वत्र त्याची चर्चा रंगली आहे. (Kangana Ranaut)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.