Lok Sabha Election 2024 : संजय निरूपम यांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट; काँग्रेसमध्ये खळबळ

Lok Sabha Election 2024 : अमोल कीर्तीकर यांना जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारीवरून संजय निरुपम यांनी टीका केली आहे. त्यातच आता संजय निरुपमांनी भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची भेट घेतली.

145
Lok Sabha Election 2024 : संजय निरूपम यांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट; काँग्रेसमध्ये खळबळ
Lok Sabha Election 2024 : संजय निरूपम यांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट; काँग्रेसमध्ये खळबळ

लोकसभेच्या जागावाटपावरून सर्वच पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. यंदा अनेक नेते उमेदवारीच्या कारणाने नाराजही आहेत. जागावाटपात स्वतःच्या पारंपरिक मतदारसंघात जागा न मिळाल्यास दुसऱ्या पक्षात जाण्याचे किंवा अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत.

नुकतेच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीमुळे नाराज असलेले काँग्रेस नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांनी अशोक चव्हाणांची भेट घेतल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

(हेही वाचा – Vijay Shivtare : मी बारामती लोकसभा लढवणारच; विजय शिवतारे यांची घोषणा)

अमोल कीर्तीकर यांच्या उमेजवारीवरून निरूपम नाराज

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाने उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघांसाठी अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांना उमेदवारी जाहीर केली. अमोल कीर्तीकर यांना जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारीवरून संजय निरुपम यांनी टीका केली आहे. त्यातच आता संजय निरुपमांनी भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची भेट घेतली.

काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या गुप्त भेटची बातमी समोर आली. या भेटीबाबत दोन्ही नेत्यांना विचारले असता, मैत्रीपूर्ण भेट असल्याचे उत्तर दोन्ही नेत्यांनी दिले आहे.

अशोक चव्हाण हे माझे जुने मित्र आहेत. मी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तिकडे गेलो होतो, त्या वेळी मी त्यांची भेट घेतली. या भेटीचा कुठलाही राजकीय अर्थ काढू नये. आमच्या भेटी होत राहतात, असे संजय निरूपम म्हणाले.

“माझे काँग्रेसचे सबंध जुने आहेत. त्यामुळे भेट होतच असते”, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.