Mumbai Hawkers : फेरीवाला मुक्त रेल्वे स्थानके: महापालिकेची कारवाई की कारवाईचा फार्स?

 Mumbai Hawkers : महापालिका प्रशासन म्हणते ५३ रेल्वे स्थानके फेरीवाला मुक्त 

1991
 Mumbai Hawkers : फेरीवाला मुक्त रेल्वे स्थानके: महापालिकेची कारवाई की कारवाईचा फार्स?
 Mumbai Hawkers : फेरीवाला मुक्त रेल्वे स्थानके: महापालिकेची कारवाई की कारवाईचा फार्स?
उच्च न्यायालयाच्या (High Court) निर्देशानुसार मुंबईतील रेल्वे स्थानके फेरीवाला मुक्त करण्यासाठी आता मुंबई महापालिकेने (Municipal Corporation) कडक पावले उचलली असून मंगळवारी रेल्वे स्टेशन पासून दीडशे मीटर अंतरावर असलेल्या फेरीवाल्यांवर धडक कारवाई करून फेरीवाल्यांना हटवण्यात आले. न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने तरी महापालिका अधिकाऱ्यांची पाठ फिरवताच पुन्हा फेरीवाल्यांनी त्याच ठिकाणी पथारी पसरवण्यास सुरुवात केली. त्यामुळे दिवसभर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असला तरी फेरीवाले मात्र निर्ढावलेले असल्याने त्यांनी पुन्हा त्याच ठिकाणी व्यवसाय करत एक प्रकारे महापालिकेला आव्हान दिले आहे. त्यामुळे ही कारवाई होती की कारवाईचा फार्स होता असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Mumbai Hawkers)
रेल्वे स्थानकांचा  परिसर फेरीवाल्यांनी गजबजलेला 
मुंबई महापालिकेच्या (Municipal Corporation) परवाना विभागाच्या वतीने मागील ०५ मार्च ते ११ मार्च दरम्यान फेरीवाल्यांविरुद्ध धडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर अंतरावरील फेरीवाल्यांवर कारवाई करून सर्व रेल्वे स्थानके फेरीवाला मुक्त करण्याच्या हेतूने महापालिकेने ही मोहीम राबवण्यास सुरुवात केली. मात्र पाच मार्चपासून मोहीम सुरू असली तरी प्रत्यक्षात मात्र रेल्वे स्थानके फेरीवाला मुक्त झाली असे कुठेच पाहायला मिळाले नाही. उलट नेहमीप्रमाणेच रेल्वे स्थानकांचा  परिसर फेरीवाल्यांनी गजबजलेला पहायला मिळत होता. (Mumbai Hawkers)
New Project 2024 03 13T145857.034
५३ रेल्वे स्थानकाशेजारील ३८६३ फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई ….
परवाना विभागाच्या आकडेवारी नुसार,  ०५ मार्चपासून ११ मार्चपर्यंत ५३ रेल्वे स्थानकाशेजारील ३८६३ फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे पाच मार्चपासून विशेष मोहीम राबवूनही महापालिकेला या कालावधीत संपूर्ण दिवस एकही फेरीवाला बसणार नाही याची काळजी घेता आलेली नाही किंबहुना फेरीवाल्यांना दिवस भरात व्यवसाय करण्याची हिंमत होणार नाही असा धाक निर्माण करता आलेला नाही. त्यामुळे ही कारवाई होती की कारवाईचा केवळ फार्स होता असा संशय व्यक्त केला जात आहे. (Mumbai Hawkers)
New Project 2024 03 13T145812.729
स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त केल्याचे चित्र..
 सकाळच्या सत्रात ज्याप्रकारे नियमित कारवाई होते, त्या प्रकारे कारवाई  होत होती. आणि त्या कारवाईचे फोटो परवाना निरीक्षक हे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून खुष करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे  या कारवाईचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आलेला नाही. दादर पश्चिम येथील रानडे मार्ग वर केवळ कारवाई करून स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त केल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. पण याच पट्ट्यात केशव सूत उड्डाण पुलावरील  फेरीवाले, डिसिल्वा मार्ग  आणि जावळे मार्ग आदी ठिकाणच्या १५० मीटरच्या आतील फेरीवाल्यांना संरक्षण देवून दादर पश्चिम रेल्वे स्थानकाचा परिसर  फेरीवाला मुक्त केल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. (Mumbai Hawkers)
वरिष्ठ अधिकाऱ्यांची फसवणूक आणि दिशाभूल…
दादर पूर्व रेल्वे स्थानका बाहेर फेरीवाले बसत नसून त्याठिकाणी महापालिकेने कारवाई  केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या कारवाईच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांची फसवणूक आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचे मागील आठ दिवसातील कारवाईतून दिसून येत आहे (Mumbai Hawkers)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.