Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्र ५ टप्प्यांत होणार लोकसभा निवडणूक; जाणून घ्या कोणत्या मतदारसंघात कधी होणार मतदान

300
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी देशातील लोकसभा निवडणूक २०२४ ची (Lok Sabha Election 2024) शनिवार, १६ मार्च रोजी घोषणा केली. त्यावेळी राज्यात लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) ५ टप्प्यांत करण्याची घोषणा केली. यात पहिला टप्पा १९ एप्रिलला मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल, तिसऱ्या टप्प्यात ७ मे, चौथ्या टप्प्यात १३ मे आणि पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे.

कोणत्या टप्प्यात कधी होणार मतदान? 

पहिला टप्पा –  १९ एप्रिल   – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा  – २६ एप्रिल  – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी

तिसरा टप्पा  –  ७ मे  –  रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-                                              सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा    –  १३ मे  – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर,                                               अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा   – २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर – पश्चिम,                                  मुंबई  उत्तर पूर्व, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.